बॉलिवूडचे करण-अर्जुन आमनेसामने!, BOLLYWOOD STAR FACE TO FACE

बॉलिवूडचे करण-अर्जुन आमनेसामने!

बॉलिवूडचे करण-अर्जुन आमनेसामने!
www.24taas.com झी मीडिया, मुंबई

यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला किंग खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चांगलाच हीट ठरला. त्यामुळं पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर शाहरुख विरुद्ध सलमान असा सामना रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

यंदाचा ईदचा मुहूर्त शाहरूख खानला चांगाच लकी ठरला आहे. अनेक रेकॉर्ड्स पार करत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सूपरडूपर हीट ठरली आहे. २०० कोटींची कमाई करून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ ही कमाई एक्सप्रेस बनली. त्यामुळं पुढच्या वर्षीही ईदच्या मुहूर्तावर आणखी एक नवी फिल्म झळकवण्याचा शाहरुखचा विचार आहे.

मात्र, सलमाननं यापूर्वीच आपण पुढच्या ईदला नवी फिल्म बॉक्स ऑफिसवर आणणार असल्याचं सांगितलं आहे. बॉलिवूडचे करण-अर्जून म्हणजे शाहरूख आणि सलमान पुढच्या ईदला बॉक्स ऑफिसवर आमनेसामने येण्याची शक्यता दिसत आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, August 26, 2013, 17:18


comments powered by Disqus