Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:28
www.24taas.com, झी मीडिया, सातारा साताऱ्यात बुधवारी रात्री सिनेनिर्माते बोनी कपूर यांच्या गाडीला अपघात झाला. या दुर्घटनेत ते जखमी झालेत. पण, त्यांना जास्त जखमा झालेल्या नाहीत.
मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर त्यांची गाडी एका ट्रॅक्टरला जाऊन धडकली आणि ही दुर्घटना घडली. रात्री नऊ वाजल्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार, बोनी कपूर आपल्या ‘तेवर’ या सिनेमाचं शुटींग संपवून मुंबईत परतत होते. तेव्हाच त्यांची गाडी महाराष्टातल्या साताऱ्यात एका ट्रॅक्टरला जाऊन धडकली. यामुळे, गाडीची बरीच नुकसानदेखील झालीय. बोनी कपूर यांचा ड्रायव्हर यावेळी गाडी चालवत होता.
श्रीदेवी यांचे मॅनेजर पंकेज खरबंदा यांच्या म्हणण्यानुसार बोनी कपूर यांच्या पाठिला दुखापत झालीय. या अपघातात ड्रायव्हरदेखील जखमी झालाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 15, 2014, 13:27