चला चिंटू येतोय... सुट्टी करा एन्जॉय, Chintu part 2 Movie in Vacation

चला चिंटू येतोय... सुट्टी करा एन्जॉय

चला चिंटू येतोय... सुट्टी करा एन्जॉय
www.24taas.com, मुंबई

छोट्या दोस्तांसाठी यंदाची उन्हाळ्याची सुट्टी मनोरंजन विश्वामुळे थोडी थराररक आणि मनोरंजक होणार आहे. कारण सर्वांचा लाडका मात्र मस्तीखोर असा दोस्त चिंटू पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. तो त्याच्या आगामी चिंटू 2 सिनेमातून...

परिक्षेच्या व्यस्त वेळापत्रकातून मोकळं झाल्यावर आपण सुट्ट्यांचं प्लॅनिंग केलं असेल? तर या प्लॅनिंगमध्ये तुम्ही अॅड करु शकता एक झकास सिनेमाचा बेत.

कारण पहिल्यांदाच एखाद्या बालचित्रपटाचा सिक्वेल येतो आहे. हा सिनेमा आहे `चिंटू-2` खजिन्याची चित्तरकथा. याआधी चिंटूने आपल्या मस्तीखोरपणातून छोट्या दोस्तांची चांगलीच करमणूक केली. खेळाचं मैदान मिळावं यासाठी भांडणारी चिंटू टीम यावेळी मात्र काहीतरी साहसी करण्यासाठी आतूर आहे. त्यासाठीच इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्सच्या सिनेमाच्या टीमनं या सिनेमाचं पोस्टर रिव्हील केलं.

या सिनेमातील चिंटू टीमनं केलेली धमाल १९ एप्रिल पासून सर्वांना सिनेमागृहात पाहायला मिळणार आहे. पण तत्पुर्वी या सिनेमाच्या टीमनं सिनेमाच्या शुटींगवेळी सर्व थरार अनुभवला. या सिनेमात बालकलाकार शुभंकर अत्रे हा चिंटूच्या भूमिकेत आहेच.


पण त्याच्यासोबत नाटककार सतीश आळेकर, अभिनेते नागेश भोसले, सुबोध भावे आणि विभावरी देशपांडे यांच्याही प्रमुख भुमिका आहेत. यावेळची उन्हाळ्याची सुट्टी धमाल मस्ती, साहस आणि रहस्य याचा अनुभव घेत एन्जॉय करायची असेल तर चिंटू 2 लवकरच सर्वांच्या भेटीला सिनेमागृहात दाखल होणारे...

First Published: Wednesday, March 13, 2013, 17:39


comments powered by Disqus