चित्रांगदा सिंग घेणार घटस्फोट..., chitrangada file divorce case

चित्रांगदा सिंग घेणार घटस्फोट...

चित्रांगदा सिंग घेणार घटस्फोट...
www.24taas.com, नवी दिल्ली

अभिनेत्री चित्रांगदा सिंह हिनं आणि तिचा पती गोल्फपटू ज्योती रंधावा यांनी अखेर घटस्फोटाचा निर्णय घेतलाय. त्यासाठी तिनं गुरगाव न्यायालयात अर्जदेखील सादर केलाय.

सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रांगदा आणि ज्योती रंधावा यांना सह-संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना जोरावर हा एक मुलगाही आहे. न्यायालयात उपस्थित होताना या दोघांनीही मीडियाला टाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यासोबत दोघांचेही जवळचे नातेवाईक तसंच काही पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

याबद्दल पुढची सुनावणी ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी न्यायालयानं दोघांनाही पुनर्विचार करण्याचा सल्ला दिलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रांगदा सिंग सध्या मुंबईत राहते. तिचा पती गोल्फपटू ज्योती रंधवा दिल्लीत राहतो. चि‍त्रांगदा बॉलिवूडमध्ये इतकी व्यस्त राहते की, तिला आपल्या पाच वर्षाच्या मुलाला व पतीला भेटायला वेळच मिळत नाही. यावरून या दोघांत कित्येकवेळा तरी वाद झाल्याचे पुढे आले होते. मात्र, प्रत्येक वेळी आणखी एक संधी म्हणत हे नाते टिकून राहिले. मात्र, आता हे दोघे एकत्र राहू शकणार नसल्याचे स्पष्ट झालंय.

चित्रांगदा सेन हिच्या वैवाहिक जीवनाबद्दल याआधीही अनेक वावड्या उठल्या होत्या. ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’, ‘ये साली जिंदगी’ आणि ‘इंकार’ सारख्या चित्रपटांत चित्रांगदानं आपल्या अभिनयाची झलक प्रेक्षकांसमोर सादर केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 11, 2013, 22:09


comments powered by Disqus