Last Updated: Friday, August 2, 2013, 10:01
www.24tass.com, झी मीडिया, मुंबई कतरीना कैफ आणि सलमानची जोडी आणि त्यांचे रेकॉर्ड काही केल्या संपत नाही. पण आता दबंग सलमान खाननं कतरीनाला चक्क मागं टाकलंय. मोबाईलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सलमाननं अव्वल स्थान पटकावलंय. एवढंच नाही तर त्यानं कतरीना कैफलाही मागं टाकलंय.
नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही बाब पुढं आलीय. मोबाईल व्हिडिओ आणि मीडिया कंपनी असलेल्या वूक्लिप्सद्वारं घेतल्या गेलेल्या ‘ग्लोबल व्हिडिओ इनसाईट सर्व्हे’मध्ये हे निष्कर्ष पुढे आले आहेत.
कंपनीनं केलेल्या एका वक्तव्यानुसार दबंग खान बॉलिवूडमधला सगळ्यात लोकप्रिय अभिनेता आहे. ज्यानं मॉडेल्स, अनेक अभिनेत्री, क्रिकेट खेळाडू आणि गायकांना सुद्धा मागं टाकलंय.
कंपनी जाहीर केलेल्या यादीनुसार सलमान पहिल्या नंबरवर आहे. त्यानंतर कतरीना कैफ, सचिन तेंडूलकर, रणबीर कपूर, किम कार्दाशिया, अनुष्का, प्रियमणी, टेलर स्विफ्ट, काजल अग्रवाल आणि नित्या मेनन यांचा समावेश आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 2, 2013, 09:55