`दबंग-3`ही तयार, यात असेल चुलबुलच्या `दबंग`गिरीची सुरूवात Dabangg3 is also ready

`दबंग-3`ही तयार, यात असेल चुलबुलच्या `दबंग`गिरीची सुरूवात

`दबंग-3`ही तयार, यात असेल चुलबुलच्या `दबंग`गिरीची सुरूवात
www.24taas.com, मुंबई

सध्या दबंग 2 च्या प्रमोशनमध्ये गुंतलेल्या सलमान खानने पत्रकारांशी बोलताना दबंग 3 सिनेमाचाही विषय काढला. ‘दबंग-2’ नंतर ‘दबंग-3’ सिनेमाही तयार असून हा वास्तवात दबंगची सुरूवात असेल.

या सिनेमात सलमान खान भ्रष्ट पण चांगल्या मनाच्या पोलीस इन्पेक्टरची भूमिका निभावत आहे. दबंग 3 ही दबंग मालिकेतील तिसरी फिल्म असली, तरी यात चुलबुल पांडेचा बालपणापासूनचा प्रवास असेल. या सिनेमात चुलबुल पांडे हा इन्स्पेक्टर चुलबुल पांडे कसा बनला याची जन्मकथा पाहायला मिळेल. मात्र जर दबंग 2 सिनेमा सुपरहिट झाला, तरच दबंग 3 आम्ही रिलीज करू, असं सलमान खान म्हणाला.

दबंग 3 सिनेमामध्येही सोनाक्षी सिन्हा असेल का, या प्रश्नावर सलमान म्हणाला, की दबंग 3 मध्ये सोनाक्षीची भूमिका आहे. पण या सिनेमात ती आणि मी समोरासमोर आलेले दिसणार नाही. ती आणि तिच्या वडिलांची भूमिका करणारा महेश मांजरेकर दोघेही सिनेमात असतील.

First Published: Thursday, December 13, 2012, 15:39


comments powered by Disqus