Last Updated: Monday, December 17, 2012, 13:31
www.24taas.com, मुंबईअभिनेता सलमान खान सध्या एका नंतर एक सुपर हिट फिल्म देत आहेत, त्यामुळे तो सदैव चर्चेत राहतो. परंतु, या हिटच्या चर्चेपेक्षा सर्वात हिट चर्चा त्याच्या लग्नाबद्दल असते. त्याच्या चाहत्यांना त्याच्या लग्नाची खूपच चिंता आहे आणि तो कधी लग्न करणार हे त्यांना जाणून घ्यायचे असते. पण सलमान खान नेहमी या प्रश्नावर उत्तर देण्यात टाळटाळ करतो. पण सलमानने आता लग्नाबद्दल आपले मौन सोडले आहे.
सलमान खानने अनुपम चोपडाशी केलेल्या बातचितमध्ये सांगितले की, मला असे वाटते की मला लग्नच नाही केले पाहिजे. बऱ्याच वर्षापूर्वी मी लग्न करण्याच्या खूप जवळ होतो, परंतु ते झाले नाही. त्यामुळे भविष्यातही असे काही होणे शक्य दिसत नाही, असे त्याने स्पष्ट केले.
लग्न न करणे ही एक विचित्र गोष्ट आहे पण मी खूश आहे. त्यामुळे या मुद्द्यावर मी ठाम राहिल असे मला वाटते. सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-२ हा येत्या २१ डिसेंबरला रिलिज होणार आहे.
First Published: Monday, December 17, 2012, 13:18