पहिल्या सिनेनिर्मितीवर दृष्टीक्षेप,Phalke produced a film on the occasion of theanniversary of sight

दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिनेनिर्मितीवर दृष्टीक्षेप

दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिनेनिर्मितीवर दृष्टीक्षेप
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

100 वर्षापूर्वी अशा एका सिनेमाची निर्मिती झाली ज्याने नवा इतिहास रचला. आज अख्ख्या बॉलिवूडचा तो गॉडफादर ठरला. राजा हरिश्चंद्र आणि त्याला घडवणारे दादासाहेब फाळके. दादासाहेबांच्या 144 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अविस्मरणीय अशा पहिल्या सिनेनिर्मितीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

अशी काही जादू होती जी भारतीयांनी याआधी कधीही पाहिली नव्हती. चलतचित्राच्या माध्यमातून सा-यांनाच अवाक करणारा हा पहिला सिनेमा ठरला जो एका मराठी माणसाने बनवला होता. कसा विचार आला असेल त्यांच्या मनात. कसा बनला असेल हा सिनेमा. उत्सुकता वाटतेय ना. चला तर मग आज सिनेमा हा शब्द भारतीयांच्या dictionaryत दाखल कसा झाला.

माणूस जी हालचाल करतो. बोलतो ती कॅमेराबध्द होऊ शकते हेच मुळात माहित नव्हतं. जे दादासाहेब फाळके यांच्यामुळे कळलं आणि भारतीय सिनेसृष्टीची जणू त्यांनी बीजं रुजवली. या आधी हिंदी सिनेमाचा कोणी विचारही केला नव्हता. जो सिनेमा दादासाहेबांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला. चार रिळचा वापर करून हा सिनेमा बनवला होता. सिनेमाला साचेबध्द करण्यासाठी प्रत्येक सिनच्यामध्ये हिंदी-इंग्लिश भाषेत टायटल्स दाखवण्यात आली होती.जेणेकरून कलाकार न बोलताही कथा प्रेक्षकांना समजू शकेल असा विचार दादासाहेबांनी त्याकाळात केला.

इतकंच नाही तर स्पेशल इफेक्टही काही सीनमध्ये देण्याचा प्रयत्न दादासाहेबांनी केला होता. राजा हरिश्चंद्रच्या प्रदर्शनाआधी अडीच वर्ष दादासाहेबांनी विदेशात जीजस क्राईसवर आधारित लाईफ ऑफ क्राईस फिल्म पाहीली आणि त्याच वेळी या नव्या माध्यमाचं जणू त्यांना वेड लागलं. महाभारत, श्रीकृष्णाचा जन्म, राजा हरिश्चंद्रांची कहाणी सिनेमाच्या माध्यमातून दाखवात येईल असा विचार दादासाहेबांनी केला. यासाठी खास विदेशात जाऊन त्यांनी कॅमेराचं टेक्निक शिकून घेतलं.

विल्यमसन कॅमेरा, फिल्म धुण्याचं-छापण्याचं मशीन खास विदेशातून त्यानी भारतात आणलं. मुंबईच्या दादर भागातचं त्यांनी सिनेमाचं शूटींग सुरु केलं. आपले दागदागिने- घर गहाण ठेवून त्यांनी सिनेमाची निर्मिती केली..एप्रिल 1913 मध्ये त्यांचा हा सिनेमा पूर्ण झाला.खास काही व्यक्तींसाठी, पत्रकारांसाठी त्यांनी सिनेमाचा खेळ ठेवला आणि 3 मे 1913 ला हा सिनेमा प्रदर्शित झाला.

जो आज इतिहासात कायमचा नोंदवला गेला. ज्यामुळे आज एक मोठी इंडस्ट्री उभी राहिली. आणि म्हणूनच आज फक्त भारतच नाही तर अख्खी दुनिया दादासाहेबांना सलाम करते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 08:37


comments powered by Disqus