चित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधन, Death of film producer Yash Chopra

चित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधन

चित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधन
www.24taas.com, मुंबई

प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा (८० ) यांचे आज लिलावती रूग्णालयात निधन झाले. यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

चोप्रा यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना बांद्रा येथील लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यश चोप्रा यांनी गेल्या महिन्यात वाढदिनी सेवानिवृत्ती जाहीर केली होती. ही सेवानिवृत्ती ‘जब तक है जान’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर घेणार असल्याचे स्पष्टे केले होते. मात्र, त्या आधी त्यांना देवआज्ञा झाली.

‘जब तक है जान’ हा सिनेमा येत्या दिवाळीत १३ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटात कतरिना, शाहरूख खान, अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. यश चोप्रां यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यांनी पाच दशकांहूनही अधिक काळापासून बॉलिवूडमध्ये अधिराज गाजवले आहेत. दीवार, कभी कभी, त्रिशूल, सिलसिला, चांदणी, वीर जारा आदी त्यांचे चित्रपट हिट्स झाले आहेत.

First Published: Sunday, October 21, 2012, 19:03


comments powered by Disqus