Last Updated: Saturday, May 25, 2013, 20:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई दीपिका पदूकोन आणि शाहरुख खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या `चेन्नई एक्सप्रेस` या सिनेमाचं शूटींग नुकतंच पूर्ण झालंय. ही बातमी दिलीय या सिनेमातील खुद्द अभिनेत्रीनं म्हणजेच दीपिका पदूकोननं... तिनं ट्विटरवर आपल्या चेन्नई एक्सप्रेसच्या शुटींगच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ टाकलाय आणि त्याला नाव दिलंय...`लव्ह ऑन द लास्ट डे`...
याच निमित्तानं शाहरुखलाही वेळ मिळालाय आणि तो ट्विटरवर पुन्हा रुजू झालाय... होय, गेल्या तीन महिन्यांपासून मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटर वरून गायब असलेला शाहरुख पुन्हा ट्विटरवर झळकलाय तो दीपिकाचं हेच ट्विट रीट्विट करून...
दीपिकाचं `लव्ह ऑन द लास्ट डे`... इथे पाहा •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, May 25, 2013, 20:09