श्रीमंतीत टॉम क्रूझला शाहरुखनं टाकलं मागे

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 20:21

हॉलिवूडवर पुन्हा एकदा बॉलिवूड भारी पडलंय. याचं कारण ठरलाय बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान... हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कलाकारांच्या यादीत अभिनेता शाहरुख खान यानं हॉलिवूडचा प्रख्यात अभिनेता टॉम क्रूझ आणि जॉनी डेप यांना मागं टाकून अव्वल स्थान पटकावलंय.

शाहरूख आपल्या शब्दाचा पक्का नाही

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 20:34

नरेंद्र मोदींच्या विरोधात देश सोडण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये ट्विट करून शाहरूख खान देखील चांगलीच टिवटिव करत होता. `नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देश सोडून देऊ`, अशी भीष्म प्रतिज्ञा शाहरूखने सात महिन्यांपूर्वी केली होती. पण आता मात्र मी असं बोललोच नाही, असा दावा शाहरूखने केला आहे.

दारूची जाहिरातीमुळे शाहरुख, अजय देवगण अडचणीत

Last Updated: Sunday, May 11, 2014, 19:00

बॉलीवूडमधील काही अभिनेत्यांना मध्यप्रदेशातील न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. सोडा विक्री जाहिरातीच्या नावाखाली दारू विक्री प्रमोट करण्याचा आरोप या सिनेतारकांवर ठेवण्यात आला आहे. नोटीस पाठवण्यात आलेल्या सिनेस्टार्समध्ये बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान, अजय देवगन, सुनील शेट्टी, सैफ अली खान आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

किंग खान शाहरुख करणवीर पुढं झुकला

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 08:49

बॉलिवूडचा बादशहा जितका फटकळ स्वभावाचा समजला जातो तेवढाच तो दिलदार सुद्धा आहे, हे नुकतंच एका प्रकरणावरून पुढं आलंय. किंग खाननं चक्क करणवीर व्होराची क्षमा मागितलीय.

शाहरुखनं केलं विराट-अनुष्काचं स्वयंवर!

Last Updated: Thursday, April 17, 2014, 15:33

बॉलिवूडचा बादशहा शाहरूखनं भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहलीकडून त्याच्या मनातली खरी बाब उघडकीस आणली. लग्नासाठी अनुष्काचं नाव समोर येताच विराट जो काही लाजला... ते सर्वांनीच पाहिलं. आयपीएल 7च्या उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खाननं विराटचं स्वयंवरच उरकलं.

शाहरुखकडून फराहला `मर्सिडिज`चं गिफ्ट

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 14:29

बॉलिवूडचा किंग खान आपल्या आगामी `हॅप्पी न्यू इअर`साठी खूप उत्सुक आहे. नुकतंच, शाहरुखनं आपली मैत्रिण आणि `हॅप्पी न्यू इअर`ची दिग्दर्शिका फराह खान हिला एक मर्सिडीज गाडी गिफ्ट केलीय.

यंदाचं `बीग बॉस` शाहरुख होस्ट करणार?

Last Updated: Thursday, March 6, 2014, 18:03

बीग बॉसच्या आठव्या पर्वाची जोरदार हवा आत्तापासूनच सुरू झालीय... आत्ता-आत्तापर्यंत यंदा हा शो सलमान खान नाही तर अभिनेता अजय देवगण करणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, आता मात्र हा रिअॅलिटी शो शाहरुख खान होस्ट करणार असल्याचं म्हटलं जातंय.

शाहरुख खानला मोबाइल फोन वापरण्यास बंदी!

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 11:34

ही बातमी खरी आहे. आता शाहरुख खान याच्या मोबाइल वापरावर बंदी आली आहे. शाहरुख बरोबरच अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण आणि बोमन ईरानी यांच्याही यात समावेश आहे.

२०१४ बॉलिवूडसाठी असेल `खान इअर`!

Last Updated: Monday, January 13, 2014, 10:29

बॉलिवूडमधल्या खानच्या सिनेमांविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते. या नवीन वर्षात बॉलीवूडच्या खान मंडळीचे एकूण ८ सिनेमे थिएटरवर धडकणार आहेत. खानचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर झळकणार म्हणजे इतर हिरोंच्या सिनेमांना टशनच म्हणावी लागेल.

मी कोणासोबतही रोमान्स करु शकते - प्रियांका चोप्रा

Last Updated: Saturday, January 11, 2014, 08:27

आघाडीची अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या चर्चेच आली आहे, ती रोमान्सवरून. तिने बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्य केलं आहे. त्याआधी तिच्या अफेअर्सबाबत वावड्याही होत्या. रणबीर, रणवीर यांच्या सोबत नाव जोडले गेले. त्याआधी शाहरुख खानबरोबरही जोडले गेले होते. त्यामुळे तिला रोमान्सबाबत प्रश्न विचारला गेला असता, मी कोणासोबतही रोमान्स करू शकते, असे बेधडक उत्तर तिने देऊन टाकले.

शाहरुख माझा अभिनयावर जळतो- सोनू सूद

Last Updated: Thursday, January 2, 2014, 20:55

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा त्याच्या आगामी येणारा चित्रपट ‘हॅपी न्यू इअर’च्या तयारीत आहे. या चित्रपटात सहकलाकार शाहरुख खानही प्रेक्षकांना दिसणार आहे. सोनू सूदनं सांगितले की, शाहरुख हा माझ्या नकारात्म भूमिकेच्या अभिनयावर जळतो.

शाहरुख खानच्या `मन्नत`मधील आग आटोक्यात

Last Updated: Friday, November 22, 2013, 08:57

गुरूवारचा दिवस अग्नितांडवाचाच दिवस ठरलाय... बॅक बे आगार जवळील आंबेडकरनगर झोपडपट्टी, एल अँड टीचं इमर्जन्सी प्लांट सोबतच किंग खान शाहरुखच्या `मन्नत` या बंगल्यात ही आग लागली. लवकरच ही आग आटोक्यात आली. त्यामुळं सुदैवानं आगीत कोणालाही हानी झालेली नाही.

'सलमान आणि शाहरुखमध्ये मैत्री... अशक्य!'

Last Updated: Friday, November 8, 2013, 13:51

ज्येष्ठ बॉलीवुड पटकथाकार सलीम खान यांच्या मते त्यांचा पुत्र सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळेच त्यांच्यात सौख्य केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

शाहरूखचा अबराम पहिल्यांदा झाला कॅमेरात कैद!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 15:32

शाहरुखच्या अब्राम या मुलाची एक झलक बघण्यासाठी आसुसलेल्या तमाम शाहरूक फॅन्सला खूशखबर! या छायाचित्रात दिसतोय तो आहे किंग खानचा अब्राम. शाहरूखच्या आर्यन आणि सुहाना या मुलांना माध्यमांमधून अनेकवेळा आपण बघितले असेल. मात्र मे महिन्यात जन्मलेल्या शाहरूकच्या या मुलाला अजून सर्वांसमोर आणण्यात आलेले नव्हते.

शाहरुख-माधुरीचं ‘टेम्प्टेशन रिलोडेड’!

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 17:39

बॉलिवूडच्या तारे तारकांचे चाहते जगभर पसरले असून त्याचा प्रत्यय बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि धकधक गर्ल माधुरी यांना ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडमध्ये आला.

इजिप्तमध्ये २५ वर्षांनंतर बॉलिवूड इंट्री, ‘चेन्नई एक्सप्रेस’ सुसाट

Last Updated: Friday, October 4, 2013, 18:46

इजिप्तमधील भारतीय चित्रपटांचा २५ वर्षांचा दुष्काळ अखेर संपला आहे. भारतात सुपरहिट ठरलेला शाहरुख खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस` हा चित्रपट गुरूवारी कैरो आणि अलेक्झांड्रिया येथील चित्रपटगृहांत अरेबिक सबटायटल्ससह झळकला.

दक्षिण कोरियाचा ‘गुडविल ऍम्बेसेडर’ होणार शाहरुख!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 16:49

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आता दक्षिण कोरियाचा "गुडविल ऍम्बेसेडर` होणार आहे.

बिग बॉसमध्ये यायचंय शाहरुखला!

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 13:49

दबंग खान आणि शाहरुख खानमध्ये तणावाच्या चर्चा नेहमीच रंगतात, असं असलं तरी शाहरुख सलमानच्या बिग बॉसचा चांगलाच फॅन आहे. दुबईत पत्रकारांसोबत बोलतांना शाहरुखनं सलमानचा शो बिग बॉसची स्तुती तर केलीच शिवाय संधी मिळाल्यास त्यात सहभागी होण्याची इच्छाही दर्शविली.

सलमाननंतर आमीरचंही शाहरुखला आव्हान!

Last Updated: Monday, September 16, 2013, 15:12

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करण्याचा शाहरुख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड ‘धूम ३′ नक्की मोडेल, असा विश्वास मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खाननं व्यक्त केलाय. सध्या धूम-३चा प्रोमो खूप गाजतोय.

बॉलिवूडचे करण-अर्जुन आमनेसामने!

Last Updated: Monday, August 26, 2013, 17:18

यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला किंग खानचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चांगलाच हीट ठरला. त्यामुळं पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर शाहरुख विरुद्ध सलमान असा सामना रंगण्याची चिन्हं दिसत आहेत.

`चेन्नई एक्सप्रेस` सीमेपारही सुसाट!

Last Updated: Sunday, August 18, 2013, 16:26

सुपरस्टार शाहरूख खानची ‘चेन्नई एक्सप्रेस’ ही पाकिस्तानमध्येदेखील सुसाट धावत आहे. या सिनेमाने पाकिस्तीनातील कराचीमध्ये सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

आपल्या मुलाचं नाव सलमान, शाहरुख ठेवू नका

Last Updated: Sunday, August 11, 2013, 17:31

ईदचं औचित्य साधून रिलीज झालेल्या शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’नं पहिल्याच दिवशी चांगला गल्ला कमावला. मात्र शाहरुख आणि सलमान ही नावं आपल्या मुलांची ठेवायची नाही, असा फतवा ईदचं औचित्य साधून उत्तरप्रदेशमध्ये काढण्यात आलाय.

`चेन्नई एक्सप्रेस`चा पहिला दिवस : कमाई ३३.१० कोटी

Last Updated: Sunday, August 11, 2013, 15:16

ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ या सिनेमाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळाला.

फिल्म रिव्ह्यू : चेन्नई एक्सप्रेस

Last Updated: Sunday, August 11, 2013, 15:21

जवळजवळ दीड महिन्यांच्या प्रमोशननंतर ईदच्या मुहूर्तावर देश-विदेशांत जवळजवळ चार हजार स्क्रीनवर ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा रिलीज झालाय.

तीन लाखांत दाखल व्हा शाहरुखच्या घरात!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:06

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या घरात राहायला मिळालं तर... शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरेल. पण...

शाहरुखला हवीय आता कोलकाता फुटबॉल टीम!

Last Updated: Tuesday, August 6, 2013, 12:57

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक अभिनेता शाहरुख खानला आता फुटबॉल टीमच्या कोलकाता फ्रेंचाईसीची खरेदी करण्याची इच्छा आहे.

पाहा, काय ठेवलं शाहरुखनं तिसऱ्या बाळाचं नावं!

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 11:51

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यानं आपल्या सरोगेट बाळाच्या नावाला पुष्टी दिलीय. शाहरुखच्या या तिसऱ्या अपत्याचं नाव ठेवलं गेलंय ‘अबराम’.

पाहा... `चेन्नई एक्सप्रेस`चा फर्स्ट ट्रेलर!

Last Updated: Thursday, June 13, 2013, 17:23

शाहरुख खान आणि दीपिका पदूकोन यांचा बहुचर्चित सिनेमा चेन्नई एक्सप्रेस लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय. यूटीव्ही मुव्हीजच्या माध्यमातून हा सिनेमा प्रदर्शित होतोय. नुकताच या सिनेमाचा फर्स्ट ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय.

‘मी इस्लामी... हरामाचा पैसा घेणार नाही’

Last Updated: Saturday, June 8, 2013, 19:44

आयपीएलमधील टीम कोलकाता नाईट रायडरचा मालक आणि बॉलिवूडचा स्टार असलेल्या शाहरुखनं पहिल्यांदाच सट्टेबाजीवर आपलं तोंड उघडलंय. किंग खाननं एका मुलाखतीदरम्यान स्पॉट फिक्सिंगबद्दल आपली मतं व्यक्त केलीत.

दीपिकाचं `लव्ह ऑन द लास्ट डे`...

Last Updated: Saturday, May 25, 2013, 20:09

दीपिका पदूकोन आणि शाहरुख खानच्या प्रमुख भूमिका असलेल्या `चेन्नई एक्सप्रेस` या सिनेमाचं शूटींग नुकतंच पूर्ण झालंय.

मुखवटा घालूनही वानखेडवर घुसू शकतो - शाहरुख

Last Updated: Saturday, May 4, 2013, 18:05

कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान यानं आयपीएलच्या मागच्या सीझनमध्ये वानखेडेवर केलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी केलेल्या गैरवर्तवणुकीचा पश्चाताप होत असल्याचं म्हटलंय.

शाहरुखची `रेड चिली` सातारकरांना तिखट!

Last Updated: Thursday, April 11, 2013, 16:46

शाहरुखचा आगामी सिनेमाचं... ‘चेन्नई एक्सप्रेस’चं शुटींग सध्या सातारा जिल्ह्यातील वाईजवळच्या मुगांव या एका छोट्या भागात सुरू आहे. या शुटींगसाठी भला मोठा सेटही उभारण्यात आलाय. पण, यामुळे सातारकर मात्र धास्तावलेत!

शाहरुखवर १०० कोटींचा खटला दाखल

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 18:19

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान पुन्हा अडचणीत येण्याचे संकेत दिसून येत आहेत. ‘ओम शांती ओम’ या सिनेमात चेष्टा केल्याप्रकरणी अभिनेता मनोज कुमार यांनी मंगळवारी ‘इरोस इंटरनेशनल’ या फिल्मकंपनी आणि शाहरुख खानविरूद्ध पुन्हा एकदा तक्रार दाखल केलीय.

धिंगाणा घालणाऱ्या शाहरूखवर बंदी

Last Updated: Monday, April 1, 2013, 07:03

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. गतवर्षी वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षारक्षकाबरोबर धिंगाणा घालणाऱ्या शाहरूखवची बंदी कायम असल्याने त्याला वानखेडेवर आता जाता येणार नाही.

शाहरुखला ‘वानखेडे’वर प्रवेश मिळणार?

Last Updated: Saturday, March 30, 2013, 08:54

गेल्या वर्षीची ‘आयपीएल-५’ गाजली ती शाहरुखच्या वानखेडे स्टेडियमवरील धांगडधिंग्यामुळे आणि त्याच्यावर स्टेडियमवर प्रवेश करण्यासाठी घातल्या गेलेल्या बंदीमुळे... आज लवकरच सुरू होणाऱ्या ‘आयपीएल-६’च्या पार्श्वभूमीवर या बंदीबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे.

सलमान टाकतोय शाहरुखच्या पावलावर पाऊल

Last Updated: Saturday, March 16, 2013, 11:11

बॉलिवूडमधल्या दोन ‘खान’मधली टशन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. हे दोन खान म्हणजे सलमान आणि शाहरुख... एकमेकांना मागे टाकण्यासाठी दोघांची चाललेली धडपडही सगळ्यांच्याच परिचयाची... पण, आता सलमान मात्र शाहरुखच्या पावलावर पाऊल टाकायला निघालाय.

शाहरुखसाठी त्यांनी घर सोडलं

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:08

मायानगरीचं अर्थात बॉलीवुड आणि झगमगत्या दुनियेचं आकर्षण सा-यांनाच असतं. त्यात बॉलीवुडचा किंग खान शाहरुखचे तर कोट्यवधी चाहते. मात्र शाहरुखच्या भेटीसाठी दोन अल्पवयीन मुलींनी हरियाणातून घरातून पलायन केल्याची घटना घडलीय.

शाहरुखच्या चित्रपटात `हिरोईन`ला प्राधान्य!

Last Updated: Saturday, March 9, 2013, 11:38

महिला दिन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला तिथं शाहरुख खानही हा दिवस आणखी खास बनवलाय. यावेळी शाहरुखनं एक वेगळी शपथच घेतलीय म्हणा ना!

...आणि प्रियांकानं शाहरुखला धुडकावून लावलं!

Last Updated: Saturday, March 2, 2013, 10:44

प्रियांका चोप्राला एकावेळी एकापेक्षा जास्त सिनेमे करताना अनेकांनी पाहिलंय... त्या सिनेमांच्या शुटींगसाठी मग रात्रीचे दिवस अन् दिवसाची रात्र करायलाही तयार असते. तसंच शाहरुखची आणि तिची ‘मैत्री’ लक्षात घेता तीनं शाहरुखबरोबर काम करण्यास दिलेला नकार अनेकांना पचत नाहीए.

शाहरुखसाठी प्रियांका आली धावून

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 11:33

मला भारतीय असल्याचा गर्व आहे आणि मला फुकटचे सल्ले नकोत, असं सांगत शाहरुखनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याच शाहरुखसाठी त्याची अत्यंत जवळची मैत्रिण मानली जाणारी प्रियांका चोप्रा धावून आलीय.

`शाहरुखच्या सुरक्षेची काळजी पाकनं करू नये`

Last Updated: Tuesday, January 29, 2013, 15:00

रेहमान मलिक यांच्या बेताल वक्तव्यावर राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठवलीय. ‘भारताच्या अंतर्गत प्रश्नावर बोलण्यापेक्षा पाकिस्तानात अराजकता माजलीय, त्याकडे लक्ष द्यावं’ अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसनं व्यक्त केलीय.

`फोर्ब्स`च्या कव्हर पेजवरचा पहिला भारतीय अभिनेता...

Last Updated: Thursday, January 24, 2013, 10:12

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची लोकप्रियता फक्त देशातच नाही तर परदेशांतही चर्चेचा विषय ठरलाय. काही ना काही कारणामुळे शाहरुख नेहमीच चर्चेत असतो. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर शाहरुख खानचं वर्चस्व दिसणार आहे.

शाहरुखने मारला विद्याला प्रेंग्नेंसीवर टोमणा!

Last Updated: Saturday, January 19, 2013, 17:56

हजरजबाबीपणात बॉलिवुडचा अभिनेता शाहरुख खान सर्वात पुढे असतो. असे काही क्षण आहेत की त्याने आपल्या कुशलतेचा परिचय दिला आहे.

पुरुष असल्याची लाज वाटतेय - शाहरुख खान

Last Updated: Saturday, December 29, 2012, 19:06

शाहरुख पुढे म्हणतो, आपल्या समाजानं आणि संस्कृतीमध्ये बलात्कार म्हणजे कामुकतेचं प्रतीक मानलं जातं. मला माफ कर कारण मीही याच समाजाचा आणि संस्कृतीचा एक भाग आहे.

प्रियांकाची `पीए`गिरी केली नाही - शाहरुख खान

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 12:40

आपला आगामी सिनेमा ‘हॅप्पी न्यू इयर’ बाबतीत मीडियामधून लोकांसमोर येणाऱ्या बातम्यांबद्दल किंग खान खूपच नाराज झालाय. आपला हा राग त्यानं सोशल वेबसाईटच्या माध्यमातून लोकांसमोर व्यक्त केलाय.

प्रियंका चोप्राची सलमानशी वाढती जवळीक

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 20:55

प्रियंका चोप्रा आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीमुळे काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये हाहःकार निर्माण झाला होता. शाहरुख आणि प्रियंकाच्या जवळीकीमुळे शाहरुखच्या वैवाहीक आयुष्यातही वादळ निर्माण झालं होतं. मात्र शाहरुखने दूर केल्यावर प्रियंकाने सलमान खानशी मैत्री वाढवली आहे.

शाहरुखला हवाय एक दिवस स्वतःसाठी

Last Updated: Sunday, November 11, 2012, 21:52

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तमाम चाहते मंडळी, कुटुंब, मित्र मंडळी यांच्या सतत गराड्यात राहून आणि सगळ्यांचं अलोट प्रेम मिळत असूनही शाहरुख खानला एकटं असल्याचं वाटत राहातं.

`राधा’ला म्हटलं ‘सेक्सी’ शाहरूखवर खटला...

Last Updated: Saturday, November 3, 2012, 14:07

करण जोहर दिग्दर्शित आणि शाहरुख खान निर्मित ‘स्टूडंट ऑफ द इअर’च्या संपूर्ण टीमवर ‘राधा’साठी ‘सेक्सी’ शब्द वापरल्यामुळे मुंबई येथील एका व्यक्तीने खटला दाखल केला आहे. करण जोहरचा सध्याचा नवा चित्रपट‘स्टूडंट ऑफ द इअर’ चांगली कमाई करत आहे.

शाहरुख-कतरिना म्हणतायत, ‘जब तक है जान’

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 16:06

यश चोपडा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या शाहरुख आणि कतरिनाच्या नव्या सिनेमाचं नाव आहे तरी काय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.

काश्मिरमध्ये शाहरुख झाला भावूक

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 16:47

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान सध्या यश चोप्रा यांच्या फिल्मचं शुटिंग करण्यासाठी काश्मिरच्या पेहलगामला गेला आहे. येथे काश्मिरच्या खोऱ्यात शुटिंग करताना शाहरुख खान भावूक झाला.

शाहरुखवर गुन्हा दाखल, केला होता तिरंगा उलटा

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:28

राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकजनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय सचिव रवींद्र ब्रह्मे यांनी फिर्याद दिली आहे.

यश चोप्रांचा नवा सिनेमा दिवाळीत

Last Updated: Thursday, August 16, 2012, 11:51

‘एक था टायगर’ सिनेमाबरोबर या सिनेमाचं पहिलं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलंय. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये यश चोप्रांनी आत्तापर्यंत बनवलेल्या सुप्रसिद्ध प्रेमकथांची झलक दाखवली जाते आणि आगामी सिनेमातील काही सीन्स दाखवले जातात.

'एक्सप्रेस' जोरात; चित्रीकरणाआधीच १०५ कोटी

Last Updated: Sunday, August 5, 2012, 17:03

रोहित आणि शाहरुखच्या नावाचं वजन आता त्यांच्या फिल्म्सवरही पडू लागलंय. त्यामुळेच की काय रोहितचा आगामी ‘चेन्नई एक्सप्रेस’ हा सिनेमा शूटींग सुरू होण्याआधीच विकला गेलाय आणि तोही तब्बल १०५ करोड रुपयांना...

शाहरूख सेल्समन – बिग बी

Last Updated: Saturday, June 2, 2012, 15:38

हिंदी अभिनेता शाहरूख खान हा सेल्समन आहे. मात्र, तसा नाही, असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांने व्यक्त केले आहे. त्यामुळे शाहरूख काय उत्तर देतो याकडे लक्ष लागले आहे.

एमसीए घटनेसाठीही किंग खाननं मागितली माफी

Last Updated: Monday, May 28, 2012, 18:36

काल चेन्नईत आयपीएल सीझन ५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं चेन्नईवर मात करत आपल्याला ‘आयपीएल किंग टीम’ म्हणून सिद्ध केलं. या विजयामुळे कोलकाता नाइट रायडर्सचा सहमालक आणि फिल्म स्टार शाहरुख खान इतका खुश झाला की वानखेडे स्टेडीयम केलेल्या गैरवर्तवणुकीबद्दल त्यानं तिथंच माफी मागितली.

शाहरूखची उतरली गुर्मी, मागितली माफी

Last Updated: Saturday, May 26, 2012, 17:57

कोलकता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आज शनिवारी माफी मागितली. तो एवढ्यावर न थांबता दंड भरण्याची तयारी दर्शविली आहे. सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्याबद्दल राजस्थान पोलिसांनी शाहरुखविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

धूर सोडणाऱ्या शाहरुखला नोटीस

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 12:09

एप्रिल महिन्यात आयपीएल खेळांच्या दरम्यान जयपूरच्या सवाई माधोसिंग मैदानात सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना शाहरुख कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. याच संबंधात जयपूर कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश शाहरुख खानला देण्यात आलेत.

आयपीएल बंदच व्हायला हवं - लालू

Last Updated: Friday, May 18, 2012, 18:32

आयपीएल सध्या सगळ्यात मोठा चर्चेचा विषय ठरलाय. या चर्चेत आता राजद प्रमुख लालूप्रसाद यादवही सहभागी झालेत. आयपीएल बंद व्हायला हवं, असं त्यांचं म्हणणं आहे.

बेलगाम ‘डॉन’

Last Updated: Thursday, May 17, 2012, 21:18

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान पुन्हा एकदा वादात अडकला आहे. वानखेडे स्टेडियमवर गोंधळ घातल्याचा तसेच धमकावल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. तर आपण निर्दोष असल्याचा दावा शाहरुखने केलाय

'सहानुभूतीसाठी शाहरुखनं केला मुलांचा वापर'

Last Updated: Thursday, May 17, 2012, 18:38

सहानुभूती मिळवण्यासाठी शाहरुख मुलांचा वापर करतोय, असा आरोप आता एमसीएचे सहसचिव नितीन दलाल यांनी केलाय. आता शाहरुबाबत जो काही निर्णय घ्यायचाय तो पोलिसच घेतील, अशी पुश्तीही त्यांनी जोडली आहे.

शाहरुख खान विरोधात गुन्हा दाखल!

Last Updated: Thursday, May 17, 2012, 18:16

शाहरुख खानविरोधात मरिन ड्राईव्ह पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुखसह इतर चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप शाहरुखवर ठेवण्यात आला.

शिवी दिली, पण माफी मागणार नाही- शाहरुख

Last Updated: Thursday, May 17, 2012, 16:24

वानखेडेवर गेलो त्यावेळी सुरक्षा रक्षकांनी माझ्या मुलांना धक्काबुक्की केली, मला शिव्या देण्यात आल्या, त्यावेळी मी मद्यप्राशन केले नव्हते, असे स्पष्टीकरण बॉलिवुडचा किंग शाहरुख खान याने दिले आहे.

शाहरुखला वानखेडेवर प्रवेश बंदी

Last Updated: Thursday, May 17, 2012, 11:43

शाहरूखच्या धिंगाणा प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत शाहरुखला वानखेडेवर प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, सर्व चर्चेअंती निर्णय घेतला जाईल, असे आयपीएल कमिशनर राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे.

अभिनेता शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा

Last Updated: Thursday, May 17, 2012, 10:46

अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यांने वानखेडे स्टेडियमवर धिंगाणा घातल्याने सर्वच हैराण झाले आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोकलता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरू होता. त्यावेळी हा प्रकार घडला. शाहरूख प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

'सलमान-शाहरुख' एकत्र दिसणार?

Last Updated: Thursday, May 10, 2012, 21:25

बॉलिवूडमधले दोन खान एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी फारच दुर्मिळ गोष्ट. पण, लवकरच ही संधी त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. हो, आपण बोलतोय सलमान आणि शाहरुखबद्दल.

शाहरुख खानची अमेरिकेत चौकशी

Last Updated: Friday, April 13, 2012, 10:11

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानला न्यूयॉर्क इमिग्रेशननं चौकशीसाठी दोन तास ताब्यात घेतल्याची घटना समोर आलीय. शाहरूख अमेरिकेतल्या येल युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी गेलाय. मात्र येलला जाण्यापूर्वीच त्याला न्यूयॉर्क विमानतळावर रोखण्यात आलं आणि त्याची कसून चौकशी करण्यात आली.

अर्जून-शाहरुख मैत्रीची अखेर?

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 10:21

प्रियंका चोप्रा आणि शाहरुख खानमध्ये अफेअर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या, त्यानंतर बरचं काही घडून गेलं असलं, तरी तो सिलसिला अद्याप चालूच आहे. या रंगतदार प्रकरणी रोज नव्या रंगाची उधळण होत आहे. आता किंग खानचा खास मित्र अर्जून रामपाल जो कायम त्याची साथ देत आला आहे त्याने मैत्री संपुष्टात आल्याचे संकेत दिले आहेत.

किंग खान, कानफटात आणि किंमती गाडी

Last Updated: Sunday, April 1, 2012, 12:25

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला रोल्स रॉईस भेट दिली आहे. मध्यंतरी एका पार्टीत किंग खानने शिरीषच्या कानाखाली जाळ काढला होता. रा-वन सिनेमावरुन शिरीषने अतिशहाणपण करत टीका करणारा ट्विट केले होते.

सलमान दिसणार श्रीकृष्णाच्या भूमिकेत

Last Updated: Sunday, March 11, 2012, 13:39

अक्षय कुमार आता सुटकेचा निश्वास टाकू शकतो. अक्षय आपल्या आगामी होम प्रॉडक्शनसाठी सलमान खान किंवा शाहरुख खान या दौघांपैकी एकाला घेऊ इच्छित होता. अखेर अक्षयला त्याच्या आगामी सिनेमा ओह माय गॉडसाठी लीड ऍक्टर गवसला आहे.

करणने प्रियांकाच्या जखमेवर मीठ चोळलं

Last Updated: Sunday, February 26, 2012, 20:56

शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्यात जवळीक निर्माण झाल्याच्या बातम्यांना मध्यंतरी उधाण आलं होतं. त्यामुळे गौरी खान कॅम्पने प्रियांकाला जवळजवळ वाळीतच टाकलं होतं. आता करण जोहरनेही प्रियांका चोप्राला झटका दिला आहे.

सलमान-शाहरुख किती दूर? किती जवळ?

Last Updated: Sunday, February 26, 2012, 18:52

सलमान आणि शाहरुख खान यांच्यात असलेलं शीतयुद्ध सगळ्यांना परिचयाचं आहेच. आता बॉलिवूडमधले हे दोन दिग्गज खान एकमेकांच्या शेजारी होणार आहेत

'धूम-४' मध्ये सलमान बनणार व्हिलन?

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 16:00

'धूम-४'ची कथा नक्की झाली आहे. शेवटचा ड्राफ्ट तयार झाला की याचं शुटींग सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे धूम-४मध्ये व्हिलनच्या रोलसाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध बॅड बॉय सलमान खानने होकार कळवला असल्याचं सांगण्यात येत आहे.

किंग खान आणि हृतिकमध्ये अग्निपथ

Last Updated: Sunday, February 12, 2012, 09:37

शाहरुख खानने शिरीष कुंडरच्या श्रीमुखात भडकावल्याच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरले गेले आणि चॅनेलवर त्यासंबंधीच्या बातम्यांचा पाऊस पडला. आता किंग खान हृतिक रोशनवर संतापला आहे.

उत्तर प्रदेश निवडणुका अन् शाहरुखचे कनेक्शन

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 12:53

उत्तर प्रदेशच्या निवडणुका, शाहरुख खान, राहुल गांधी आणि मुख्यमंत्री मायावती यांचे कनेक्शन काय असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्यात काढाल.

श्रेयसचा नवा लूक

Last Updated: Thursday, February 2, 2012, 19:28

‘WILL YOU MARRY ME’ या सिनेमातून श्रेयस तळपदे एका वेगळ्या लूकमधून आपल्या समोर येणार आहे आणि हा लूक शाहरुखच्या ‘डॉन 2’ सिनेमातील लूकसारखा असणार आहे.

बिच्चारा सलमान !

Last Updated: Thursday, February 2, 2012, 18:58

शाहरुख खान आणि शिरीष कुंदर यांच्या 'त्या' पार्टीनंतर सलमान खानने शिरीष कुंदरला फोनकरून पार्टीबद्दल बित्तंबातमी जाणून घेतल्याचं बोललं जातं होतं.

आमीर ठरला शाहरुखपेक्षा सरस !

Last Updated: Thursday, February 2, 2012, 18:46

शाहरुख खान आणि आमीर खानमधलं ‘स्टारवॉर’ जूनंच आणि आता पुन्हा एकदा ‘तलाश’ सिनेमाच्या निमित्ताने आमीरने शाहरुख खानला झटका दिला आहे.

थप्पड प्रकरणाचा मुलांवर परिणाम- किंग खान

Last Updated: Thursday, February 2, 2012, 16:08

शाहरुख खान आणि दिग्दर्शक शिरीष कुंडर यांच्यात झालेल्या वाद त्याच्या चिंतेचे कारण बनलं आहे. शाहरुखने अद्याप या वादावर कोणतीही जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही आणि त्याबाबत प्रश्न विचारले असता त्याचं उत्तर देण्याचे त्याने टाळलं आहे

शाहरूखच्या थप्पडीची गुंज सोशल साईटवर

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 16:56

शाहरुख खानने फराह खानच्या नवऱा शिरीष कुंडरला बदडल्यानंतर सोशल नेटवर्किंग साईटवर जोकना उधाण आलं आहे.

किंग खानच्या विरोधात एफआयआर नाही

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 16:50

अग्निपथच्या पार्टीत फराह खानचा नवरा शिरीष कुंडरला किंग खानने कानफटवल्याच्या बातमीने अवघं बॉलिवूड हादरलं आहे. किंग खानचा तोल कशामुळे ढळला असावा यावरुन तर्ककुतर्क लढवण्यात येत आहे. पण शिरीष कुंडरने आपण शाहरुखच्या विरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवणार नसल्याचं म्हटलं आहे.

जेव्हा शाहरुख कतरिनाला 'किस' करतो....

Last Updated: Monday, January 16, 2012, 16:03

कुटुंबवत्सल म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुखचं सध्या त्याची पत्नी गौरीशी भांडण सुरू असल्याची बातमी एव्हाना सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे. अशातच १८व्या स्क्रीन ऍवॉर्ड फंक्शनमध्ये भर स्टेजवरच कतरिना कैफला चुंबन दिलं.

शाहरुख -आमिरमध्ये 'महाभारत' !

Last Updated: Saturday, January 14, 2012, 17:38

‘रा.वन’ बनवून झाल्यावर आता शाहरुख खानची चक्क ‘महाभारत’ बनवण्याची इच्छा आहे. पण, महाभारताने केवळ शाहरुखलाच मोहिनी घातली आहे असं नाही, तर आमिर खाननेही यापूर्वी महाभारतावर सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

V R Just फ्रेंड्स- शाहरुख, प्रियांका

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 16:44

एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते हा फिल्मी डायलॉग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण फिल्म इंडस्ट्रीतले लोकही त्याचा वापर करतात आणि अफवा पसरवतात. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सध्या त्याचाच अनुभव शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा घेत आहेत.

टायगर विरुद्ध डॉन

Last Updated: Thursday, December 29, 2011, 11:04

शाहरुख आणि सलमानमधलं स्टारवॉर काही नवं नाही आणि आता तर हे स्टार वॉर वाढत जातंय.असं म्हणतात 'सलमान की दोस्ती भी देखने लायक और दुश्मनी भी' आणि सलमानची दुश्मनी म्हटलं की शाहरुख खानचं नाव नकळतपणे समोर येतं

बॉलिवूड का 'डॉन' किंग खान

Last Updated: Saturday, December 24, 2011, 12:37

'डॉन दे चेस बिगीन्स' हा जुन्या जमान्यातील क्लासिकचा रिमेक असल्याचं ओझं फरहानच्या मानगुटीवर होतं पण सिक्वलने ते फेकून दिलं आहे. आणि एवढंच नव्हे, तर पहिल्या भागापेक्षा सिक्वल सरस ठरला आहे.

किंग आणि दबंग खानमधलं शीत युद्ध

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 11:56

शाहरुख खान आणि सलमान खान यांनी एकाच पार्टीला हजेरी लावली निमित्तं होतं रितेश देखमुखच्या ३३ व्या वाढदिवसाचे, पण त्यांच्यात असलेला दुरावा मिटवण्यात मात्र रितेशला यश आलं नाही. एसआरके आणि सलमान या दोघांनी करण अर्जून, कुछ कुछ होता है आणि हम तुम्हारे है सनम अशा तीन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.

करिनाचा शाहरूखला झटका

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 12:09

२०११ मध्ये बॉडिगार्ड सिनेमा हिट ठरला तर रा-वन फ्लॉप आणि आता हे करिना कपूरनेही जाहीरपणे मान्य केलंय. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये करिना कपूरने बॉडीगार्डला हिट सिनेमा ठरवून शाहरुख खानला एकप्रकारे झटका दिलाय.

'डॉन 2' का आना मुश्कील !

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:53

१९७८ मध्ये अमिताभ बच्चन स्टारर डॉनच्या रिमेकची परवानगी नरिमन फिल्म्सने दिग्दर्शक फरहान अख्तरला दिली होती.पण या सिनेमाचा सिक्वल म्हणजेच डॉन 2ची परवानगी कोणालाही देण्यात आलेली नाही.

किंग खानच्या हस्ते 'इफ्फी'चे उद्घाटन

Last Updated: Monday, November 21, 2011, 07:27

गोव्यात भरणाऱया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन २३ नोव्हेंबरला मडगाव येथे बॉलिवूड सुपरस्टार किंग खान याच्या हस्ते होणार आहे

'झी सिने पुरस्कार' सोहळा रंगणार मकाऊमध्ये

Last Updated: Sunday, November 20, 2011, 05:53

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा 'झी सिने पुरस्कार' पुढील वर्षी मकाऊमध्ये रंगणार आहे.

दिलदार किंग खान

Last Updated: Saturday, November 12, 2011, 11:35

शाहरुख खान आपल्या दिलदारीसाठी प्रसिध्द आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींनी सढळहस्ताने भेटी देण्याबाबतीत शाहरुख खानच्या हात कोणी धरु शकत नाही. रा-वनच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्यांना शाहरुखने नव्या कोऱ्या कार भेट देण्याचं ठरवलं आहे. आणि त्यासाठीच शाहरुखने पाच नव्या बीएमडबल्यु ७ सिरीज कार बुक केल्या आहेत.

रा-वन vs रेडी

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:13

ठसन घ्या ठसन द्या मी स्टार प्रवाहवरच्या आता होऊन जाऊ द्या शो बद्दल बोलत नसून शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील खून्नसबद्दल लिहित आहे. रा वन प्रदर्शित झाल्यापासून सलमान खानच्या सिनेमापेक्षा अधिक कलेक्शन करण्याची शाहरुखची इर्षा लपून राहिलेली नाही. सलमान आणि शाहरुखच्या सिनेमांची बॉक्स कलेक्शनसाठीची जीवघेणी स्पर्धा सातत्याने चर्चेत आहे.

डॉन-२ ची सुटका कठीण !

Last Updated: Friday, November 11, 2011, 13:37

शाहरूख खानचा आगामी बहुचर्चित सिनेमा डॉन २ वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. . नरीमन फिल्म्स या कंपनीने शाहरूख आणि फरहान आख्तर यांना लीगल नोटीस पाठवली आहे.

हॅपी बर्थडे किंग खान

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:23

किंगची उतरली झिंग

Last Updated: Saturday, October 29, 2011, 11:16

शाहरुखची दिवाळी की दिवाळं?

Last Updated: Monday, October 24, 2011, 10:57

दिवाळीत शाहरुख खानचा ‘रा. वन’ रिलीज होतोय. संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष या सिनेमाच्या भवितव्याकडे लागलं आहे. ‘रा वन’च्या निर्मितीसाठी तब्बल १६० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.