रणबीर-कॅटला दीपिकाचा सल्ला!, deepika`s advice for ranbeer-katrina

रणबीर-कॅटला दीपिकाचा सल्ला!

रणबीर-कॅटला दीपिकाचा सल्ला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नुकतीच, अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचे स्पेनच्या समुद्रकिनावर मस्ती करताना काही फोटो मीडियामध्ये झळकले होते. यावर कतरिना कैफ लालबुंद झाली आणि मीडियानं आपल्या खाजगी आयुष्यात ‘कॅमेरा’ घातलेला आपल्याला अजिबात पसंत नाही. मीडियानं असं कुणाच्याही खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणं योग्य नाही असा सल्ला देतानाच आपण यानंतर कधीच बिकिनी परिधान करणार नाही असा पणच तिनं घेतला. पण, या प्रकरणावर रणबीरची एक्स गर्लफ्रेन्ड दीपिका पदूकोन हिचं मत मात्र वेगळं आहे.

एका न्यूज चॅनलशी बोलताना दीपिका म्हणते, ‘जर तुम्ही स्टार आहात, पब्लिक फिगर आहात तर अशा गोष्टी तुमच्याबरोबर होणारच. पण, अशा गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्हीच सावधान राहायला हवं’… आत्ता बोला!
सोबतच दीपिकानं मीडियाचा पक्ष घेत म्हटलं, ‘मला नाही वाटत की यासारख्या प्रकरणांत कुणाला दोषी ठरवलं गेलं पाहिजे... कारण, माझ्याबरोबर तर आजपर्यंत असं झालेलं नाही’.

आता, दीपिकासोबत हे घडलं असतं तर तिनं हीच प्रतिक्रिया दिली असती का? याचं उत्तर तिच देऊ शकते. मात्र, रणबीर-कॅट यावर काय उत्तर देणार याकडे आता त्यांच्या चाहत्यांचं नक्कीच लक्ष असेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 13:18


comments powered by Disqus