`दिल्ली सफारी` थेट ऑस्करच्या शर्यतीत, `Delhi Safari` cinema in Oscar race

`दिल्ली सफारी` थेट ऑस्करच्या शर्यतीत

`दिल्ली सफारी` थेट ऑस्करच्या शर्यतीत
www.24taas.com, नवी दिल्ली

`दिल्ली सफारी` या सिनेमाने थेट ऑस्करच्या शर्यतीत मजल मारलीय. शहरीकरण, आणि त्यामुळे निर्सगावर होणारा परिणाम हा विषय मांडण्यात आलाय दिल्ली सफारी या सिनेमात.

या सिनेमाला ऑस्करसाठी सर्वोत्कृष्ट अँनिमेशनपटांच्या यादीत नामांकन मिळालंय.. दिल्ली सफारीसह जगभरातून २१अँनिमेशनपट स्पर्धेत आहेत..गोल्बलायझेशनमुळे जंगलतोड केली जातेय, परिणामी जंगलांची संख्या झपाट्याने कमी होतेय.. हाच विषय प्राण्यांच्या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलाय.

हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हा अँनिमेशनपट असून भारतातील पहिला स्टिरिओस्कोपिक थ्रीडी अँनिमेशनपट हे दिल्ली सफारीचं वैशिष्ट्य आहे. बॉलिवूडच्या अनेक नामवंत कलाकारांनी सिनेमातल्या प्राण्यांना आवाज दिलाय.

First Published: Wednesday, November 28, 2012, 10:30


comments powered by Disqus