Last Updated: Sunday, January 12, 2014, 13:09
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसलमान खानसोबत ज्या हिरोईनचं नाव जोडलं गेलं किंवा त्याच्यासोबत काम केलं तिचं करिअर सेट झालंच समजा. यामध्ये कतरिना, सोनाक्षी, असीन याचं नावं घेता येईल. आता यात आणखी एक नाव जोडलं गेलंय ते म्हणजे डेजी शाह हीचं...
`संधी मिळाल्यास माझ्या सर्व सिनेमांमध्ये सलमानसोबतच रोमान्स करायला आवडेल, असं डेजी शाहनं म्हटलं आहे. सलमान खानसोबत काम करण्याचं प्रत्येकीचं स्वप्न असतं आणि मला ती संधी मिळाली आहे. तो सोबत काम करताना खूप काळजीही घेतो,` असं उत्स्फुर्तपणे ती सांगते.
डेजी शाहचा सलमान खानसोबत `जय हो` सिनेमातून करिअरची सुरुवात करतेय. आता दबंग आणि हँडसम सलमानसोबत काम करायला मिळणं तिच्यासाठी लहान गोष्ट नाही. त्यामुळं सल्लूसोबत काम करुन खूप खूश असल्याचं ती सांगतेय.
डेजी आणि सलमानमध्ये काहीतरी नक्कीच सुरु आहे, अशी चर्चा आहे. त्यातच आता ही हिरोईन सलमानसोबत प्रत्येक सिनेमात रोमान्स करायला आवेडल, असं म्हणतेय. म्हणजेच दाल में कुछ तो काला है.
गेल्या वर्षभरात सलमानचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. त्यामुळं त्याच्या फॅन्ससाठी आता सलमानचा `जय हो` लवकरच भेटीला येणार आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होत आहे. सध्या सलमान या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करतोय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, January 12, 2014, 13:09