जेव्हा दीपिका रणबीरच्या प्रेमात पडली होती..., dipika talking about ranbeer & her relationship

जेव्हा दीपिका रणबीरच्या प्रेमात पडली होती...

जेव्हा दीपिका रणबीरच्या प्रेमात पडली होती...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

निर्माता दिग्दर्शक याच्या करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करन’ या शोमध्ये अभिनेत्री दीपिका पादूकोण पुन्हा एकदा दिसली. यावेळी, मात्र, रणबीरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर आता तिनं आपला तोल बराच सावरल्याचं दिसलं. संपूर्ण कार्यक्रमात तिनं रणबीरविषयी एकही वाईट शब्द काढला नाही.

पहिल्यांदा जेव्हा दीपिका करणच्या कार्यक्रमात आली होती तेव्हा तिनं आपल्या एक्स-बॉयफ्रेंडवर तोंडसुख घेतलं होतं. यावेळी रणबीरचं आणि तिचं नुकतंच ब्रेक अप झालं होतं. तेव्हा तिनं रणबीरच्या प्लेबॉयच्या इमेजची खिल्ली उडवली होती. इतकंच नाही तर तिनं रणबीरला कंडोमच्या जाहीराती करण्याचाही सल्ला दिला होता.

यावेळेस ती तिची मैत्रिण प्रियांका चोप्रासोबत आली होती. तिनं रणबीरविषयी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. परंतु, यावेळी तिनं रणवीर सिंहसोबतच्या जवळकीबद्दल मात्र ती गप्पच राहिली.

रणबीरबद्दल बोलताना तिनं म्हटलं, ‘जेव्हा मी रणबीरसोबत अडकले होते तेव्हा मला खरंच वाटत होतं की मी प्रेमात पडलेय.... मला वाटायचं की हे नातं खूप पुढे जाईल. पण, काही कारणांमुळे हे शक्य झालं नाही. त्यानंतर मात्र कोणत्याही नात्यात भावनिकरित्या अडकण्यासाठी मला भीती वाटते’.

परंतु, सध्या मात्र रणबीर आणि आपल्या नात्यात सहजता आलीय, असंही तिनं म्हटलंय. ब्रेकअपनंतरही रणबीर आणि दीपिका ‘ये जवानी है दिवानी’ या सिनेमातही एकत्र दिसले होते. दीपिकाच्या म्हणण्याप्रमाणे ‘आम्ही दोघंही याविषयी खूप स्पष्ट आहोत की आम्ही आपापल्या जीवनात पुढे सरकलोय. त्यामुळेच कुणालाही कोणत्याही गोष्टीची चिंता किंवा असुरक्षितता वाटण्याची गरज नाही’.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 15:30


comments powered by Disqus