मराठी माणसाची झेप, बीग बी अमिताभ यांच्या घरात, Diwali kandil at Amitabh home

मराठी माणसाची झेप, बीग बी अमिताभ यांच्या घरात

मराठी माणसाची झेप, बीग बी अमिताभ यांच्या घरात
www.24taas.com, ठाणे

बीग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगला उजळणार आहे तोच मुळी मराठमोळ्या कंदिलाने... आणि हेच मराठमोळे कंदील मराठी माणसाने घडवले आहेत. या वर्षी अमिताभ बच्चन यांच्या दिवाळीला ठाण्यातल्या आकाशकंदिलांची रोषणाई लाभणार आहे.

ठाण्यातल्या मराठमोळ्या कैलास देसले यांच्याकडून अमिताभ बच्चन यांच्याघरी दोनशे आकाशकंदिल पाठवले जाणार आहेत. मागील पंधरा वर्षांपासून ईको फ्रेंडली आकाशकंदिल करण्यासाठी कैलास देसले प्रसिद्ध आहेत.

मात्र या वर्षी त्यांचे आकाशकंदिल थेट अमिताभच्या घरी जाणार असल्याने देसले परिवार आनंदात आहे. बीग बीं अमिताभ यांच्या घरात हे कंदील लागणार असल्याने देसले यांना जणू आकाशच ठेगणं झाल्यासारखं वाटतयं.

First Published: Tuesday, November 6, 2012, 10:48


comments powered by Disqus