Last Updated: Wednesday, October 9, 2013, 11:24
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबईअभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनने दुसऱ्या मुलाबाबत अंदाज बांधू नका, असे म्हटले आहे. आराध्यानंतर दुसरे मुल? याबाबत आपणाला माहितच पडेल, असे ती म्हणाली.
स्टेम सेल बेंकिंग ब्रॅंडच्या कार्यक्रमात आली असताना तिने दुसऱ्या मुलाबाबत अंदाज बांधू नका, असे ऐश्वर्याने सांगितले. यावेळी तिला विचारण्यात आले की, दुसऱ्यांदा आई होण्यासाठी आपण स्टेम सेल बेंकिंगचा पर्याय स्वीकारण का? त्यावेळी ती म्हणाली, तुम्हाला नक्की काय म्हणायचेय ते समजले आहे. ज्यावेळी असा क्षण येईल, तो आपल्या सर्वांना माहित होईल. तोपर्यंत अंदाज बांधू नका.
या वर्षी नोव्हेंबरमध्ये आई ऐश्वर्या आणि वडील अभिषेक बच्चनची लाडली आराध्या दोन वर्षांची होणार आहे. आराध्या आमच्या जीवनातील एक महत्वाची बाब आहे. ती आमच्यासाठी खास बाब आहे. तिने जीवनात आनंद आणि प्रेम दिले आहे. मला आराध्याच्या रूपाने वरदान मिळाले आहे. आईचा अनुभव खूप भाग्यशाली आहे, असे ऐश्वर्याने म्हटले आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, October 9, 2013, 11:24