‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हांला माहीत आहे का?,Do you know Interesting facts of besharm?

‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?

‘बेशरम’च्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता रणबीर कपूरचा आज रिलीज होणारा ‘बेशरम’ची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या काही अनोख्या आणि आपल्याला माहीत नसलेल्या बाबी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

१९७८ मध्येही ‘बेशरम’ नावाचा पिक्चर येऊन गेलाय. यात अमिताभ बच्चन आणि शर्मिला टागोर प्रमुख भूमिकांमध्ये होते. या ‘बेशरम’ चे दिग्दर्शन प्रसिध्द विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांनी केलं होतं. हा पिक्चर सुपर फ्लॉप झाला होता.

रणबीरच्या चित्रपटाचं नाव आधी ‘कारनामा’ होतं. मात्र रणबीरची भूमिका लक्षात घेऊन ‘बेशरम’ ठेवण्यात आलं. आधी या चित्रपटाची निर्मीती वॉयकॉम १८ बॅनर करणार होतं, पण बजेट जास्त होत असल्याने वॉयकॉम १८ ने निर्मीतीतून माघार घेतली. आता या चित्रपटाची निर्मीती रिलांयसने केली आहे.

रणबीरच्या नायिकेच्या भूमिकेसाठी तापसी पन्नूची ऑडिशन झाली होती. तापसी पन्नूच्या तारखांच्या अडचणींमुळे या भूमिकेसाठी रणबीरची मैत्रिण पल्लवी शारदाला साईन केलं गेलं.

रियल लाइफमध्ये रणबीर पित्यासोबत बोलतांना मर्यादेत राहतो. तरीही ‘बेशरम’च्या एका दृश्यात रणबीर ऋषि कपूर यांच्या समोर असभ्य भाषेत बोलातांना दिसतो.

‘दोन ऑक्टोबर (गांधी जयंती) ला बुधवारी रिलीज होणारा बेशरम’ हा पहिलाच सिनेमा आहे. ‘जब तक हैं जान आणि ‘सन ऑफ सरदार’ हे दोन चित्रपट मंगळवारी (१३ नोव्हेंबर २०१२) रिलीज झाले होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 2, 2013, 16:10


comments powered by Disqus