Last Updated: Sunday, March 31, 2013, 17:09
www.24taas.com, मुंबईसाजिद खानच्या हिम्मतवाला सिनेमावर समीक्षकांनी चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. पण, अनेक सामान्य प्रेक्षकही हिम्मतवालाचा रिमेक पाहून वैतागले आहेत. हा सिनेमा पाहाण्यात वाया घालवलेल्या वेळेचा आणि पैशाचा हिशेब करत काही प्रेक्षकांनी ट्विटरवर धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यातल्या काही गमतीदार प्रतिक्रिया-
राम गोपाल वर्मा-
मला एक मॅसेज आला, त्यावर काय भावना व्यक्त कराव्यात समजत नाहीत....साजिद खानचा हिम्मतवालाशी तुलना केली, तर राम गोपाल वर्मा की आग हा सिनेमा म्हणजे अभिजात कलाकृती म्हणावा असा क्लासिक सिनेमा वाटू लागला आहे.
दीपजॉय घोष-
मला काही दिवसांपूर्वी साजिद खानने काही आठवड्यांपूर्वी उच्चरलेले शब्द आठवत आहे, तो म्हणालेला, “मै वादा करता हूँ, पहले ३ दिन हिम्मतवाला की तिकिट्स नही मिलेगी.”फालतू
मिस्चिव्हिअस मंक-
आता सेलिब्रिटींचे साजिद खानला अभिनंदन करणाऱ्या ट्विट्सची मी वाट पाहात आहे... ज्यात हिम्मतवाला किती अप्रतिम, फ्रेश आणि वेगळा सिनेमा आहे, असं कोण म्हणतंय त्या सिनेमाला बघू...
मोहित धर्मानी
हिम्मतवालाच्या गाण्यात त्यांनीच सुचवलं आहे... ‘मार दे बम पे लात’ मग वाट कसली पाहाता? चला साजिद खानच्या घरी त्याच्या बमवर लाथा मारायला...
अली मेंटल-
यकुझाजूमिन.... असंच काहीतरी वाटलं साजिद खानचा हिम्मतवाला पाहाताना... आपल्यालाच सिनेमाचं तंत्र समजल्याचा माज दाखवणाऱ्या साजिद खानला आता चांगलीच अद्दल घडली असेल.
First Published: Sunday, March 31, 2013, 17:09