Last Updated: Wednesday, May 28, 2014, 18:50
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदेशमुख आणि भगनानी कुटुंबात एक आनंदाची बातमी आहे. अभिनेता रितेश देशमुखचा मोठा भाऊ धीरज देशमुखला मुलगा झालाय. रितेशनं ‘ट्विट’करून ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचा जन्म आणि आता या त्यांच्या नातवाचा जन्म एकाच दिवशी म्हणजे 25 मेला झाला.
धीरज देशमुख आणि त्याची बायको दीपशिखा (हनी भगनानी) यांना मुलगा झालाय. त्यामुळं देशमुख आणि भगनानी कुटुंबात जल्लोषाचं वातावरण आहे. रितेशनं ट्विटरवर म्हटलंय की, “मी तिसऱ्यांदा काका झालोय. आणि पुढे त्यानं सांगितलं की माझे वडील विलासराव देशमुख म्हणजे बाळाच्या आजोबांचाही जन्म याच दिवशी झाला होता. म्हणून आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे.”
काही दिवसांपासून जेनेलिया आणि रितेशही आई-वडील होणार असल्याची चर्चा आहे. जेनेलिया प्रेग्नेंट असल्यामुळं कान्स फिल्म फेस्टिव्हलला गेली नाही, अशी बातमी आहे. आता ही बातमी किती खरी आहे हा येणारा काळच सांगेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 28, 2014, 18:50