`एक था टायगर` गल्ला २१० कोटी, `Ek Tha Tiger` earns an enormous Rs. 210 cr

`एक था टायगर`चा गल्ला २१० कोटी

`एक था टायगर`चा गल्ला २१० कोटी
www.24taas.com,मुंबई

सलमान खानचा `एक था टायगर` हा सिनेमा कमाईचे नवनवे रेकॉर्ड करतोच आहे.सिनेमा रिलीज होऊन दोन आठवडे पूर्ण झाले नसले तरीही या सिनेमाने २०० कोटींची कमाई केली आहे.

१५ ऑगस्टला हा सिनेमा रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी ३२ कोटींचा गल्ला जमवला. पाच दिवसात १०० कोटी रुपये या सिनेमाने कमाई केली आणि इतक्या कमी दिवसात १००कोटी कमावणारा हा एकमेव सिनेमा ठरला.

आत्तापर्यत भारतात या सिनेमाने १७५ कोटींची कमाई केली असून जर परदेशातल्याही कमाईचा विचार केला तर आत्तापर्यत एक था टायगर सिनेमाने २१० कोटींचा गल्ला जमवला आहे.

मात्र भारतातल्या कमाईचा विचार केला तर सलमानने अजूनही आमीरच्या थ्री इडियटचा रेकॉर्ड मोडलेला नाही. थ्री इडियटने भारतात २०२ कोटींचा गल्ला जमवत नंबर वनच्या स्थानावर आहे.

तर सलमानचा एक था टायगर भारतात १७५ कोटी जमवून दुस-या स्थानावर विराजमान आहे. तर सलमानचाच बॉडिगार्ड सिनेमा १४८ कोटी गल्ला जमवत तिस-या स्थानावर आहे.

First Published: Monday, August 27, 2012, 21:43


comments powered by Disqus