सुपरफास्ट टायगर... पाच दिवसांत १०० कोटी!... ‘Ek Tha Tiger’ is Bollywood’s fastest 100 cr grosser

सुपरफास्ट टायगर... पाच दिवसांत १०० कोटी!

सुपरफास्ट टायगर... पाच दिवसांत १०० कोटी!
www.24taas.com, मुंबई
बॉलिवूडचा टायगर सलमान खान यंदा ईदबरोबरच दिवाळी साजरी करत आहे तर त्याचा सिनेमा ‘एक था टायगर’ थिएटर्समध्ये एकच धूमधडाका उडवून देतोय. १५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमानं केवळ पाच दिवसात ‘१०० कोटी क्लब’मध्ये स्थान मिळवलंय.

‘एक था टायगर’ अपेक्षेप्रमाणे एक एक रेकॉर्ड बनवायला सुरुवात केलीय. पहिल्याच दिवसी जवळजवळ ३३ करोड आणि त्यानंतर केवळ पाच दिवसांत या सिनेमानं १०० करोड रुपयांची कमाई केलीय. हा सलमान खाननं आणि त्याच्या सिनेमानं रचलेला आणखी एक इतिहासच रचलाय. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या सिनेमानं ओपनिंग कलेक्शनमध्ये रेकॉर्ड बनवायला सुरुवात केली होती. एक था टायगर हा बॉलिवूडमधला पहिला सिनेमा आहे ज्यानं केवळ पाच दिवसांत १०० करोड रुपयांपेक्षा जास्त कमाई केलीय. ही माहिती दिलीय सलमानच्या बहिणीनं... अर्पितानं... ‘पहिल्या पाच दिवसांत एक था टायगरनं १००.१६ करोड रुपयांची कमाई केलीय’, असं अर्पितानं ट्विट केलंय. या अगोदर सलमानच्या दबंग, रेडी आणि बॉडीगार्डनं १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवलं होतं. तर यश राज बॅनरची ही पहिलीच फिल्म आहे जिनं १०० कोटींची कमाई केलीय.

आता, आमिर खानच्या ‘थ्री इडियट’चा रेकॉर्ड सलमान तोडणार का, याकडेच सगळ्यांच लक्ष लागलंय. २०० करोडपेक्षा जास्त कमाई करणार ‘थ्री इडियट’ हा बॉलिवूडमधला एकुलता एक सिनेमा आहे.

First Published: Tuesday, August 21, 2012, 13:18


comments powered by Disqus