आमीर `बोअरींग` , ऐश्वर्या `प्लास्टिक`- इमरान हाश्मी , Emraan Hashmi called Aishwarya Rai "plastic"

आमीर `बोअरींग` , ऐश्वर्या `प्लास्टिक`- इमरान हाश्मी

आमीर `बोअरींग` ,  ऐश्वर्या `प्लास्टिक`- इमरान हाश्मी
www.24taas.com , झी मीडिया,

कॉफी विथ करण कार्यक्रमात इमरान हाश्मीने अमीर खानला बोअरींग म्हटल आहे. तसेच इमरानला ऐश्वर्या रॉय बच्चन चक्क प्लास्टिक वाटते. महेश भट्ट आणि इमरान हाश्मी ह्या मामा-भाच्याच्या जोडीन करण जौहरच्या कार्यक्रमात हजेरी लावली.

महेश भट्ट तर आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध आहेतच. त्याचाच वारसा इमरानने पुढे चालवला. इमरान वादग्रस्त विधान करत असताना महेश भट्ट कसे मागे राहतील. मग त्यांनीही काजोलला ओव्हर अक्टेड अक्टरेस म्हणलं. तर संजय लीला भन्साळी हा त्यांना ओव्हर अक्टेड डायरेक्टर वाटतोय.

आपल्या देशात कोणाकडे सेंस ऑफ ह्युमर नाही, अशी खंत महेश भट्ट यांनी व्यक्त केली. ह्याच शोमध्ये सलमान स्वतःला वर्जीन म्हणतो. करीना कतरीनाला भाभी म्हणते. करण जौहरचा रियालिटी शो हा वादग्रस्त विधान करण्यासाठीच व्यासपीठ बनला आहे की काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, January 23, 2014, 18:13


comments powered by Disqus