Last Updated: Monday, July 9, 2012, 19:26
सुरेंद्र गांगण
कोणाचे डोके कुठे आणि कसे चालेल ते काही सांगता येणार नाही. निदान चांगले करता येत नसेल तर निदान वाईट असे करू नका, अशी म्हण आहे. मात्र, इथे तर चांगले करण्याच्या नावाखाली आपल्या हातून चूक होतेय याकडे दुर्लक्ष होताना दिसते. मुंबईत मध्य रेल्वेने एक चांगला निर्णय घेतला. त्यामुळे ४० दिवस प्लॅटफॉर्मवर कुठेही प्लास्टिकचा कचरा दिसून आला नाही. त्यामुळे मुंबईकरांनी मध्य रेल्वे प्रशासनाचे कौतुक केले. मात्र, आपण या कौतुकाचे पात्र नाहीत, हेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही केलेली बंदी उठवून दाखवून दिले.