Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:16
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईबॉलिवूडचं हॉट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि कतरीना कैफ लवकरच साखरपूडा करणार असल्याची चर्चा आहे. या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत बॉलिवूड आणि बॉलिवूड फॅन्समध्ये प्रचंड चर्चा सुरू होती. आपल्या नात्याबद्दल ते गंभीर असल्याचं समजतंय.
एका ऑनलाईन टेबलायडमधील एका रिपोर्टनुसार रणबीर कतरीनाच्या रोमांसच्या चर्चांना आता विराम द्यायचा, असं या जोडीनं ठरवलंय. म्हणूनच त्यांनी साखरपूडा करण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार साखरपुड्याची तारीख अजून ठरली नसली तरी दोघं याबद्दल खूप गंभीर आहेत.
सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी स्पेनमध्ये गेलेल्या रणबीर आणि कतरीनाचे आयबिज बीचवरचे फोटो लिक झाले होते आणि त्यानंतर दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत चर्चा सुरू झाली. या फोटोंनी कतरीनानं ऋषी आणि नीतू कपूरचीही झोप उडवून दिली होती. तर या फोटोंच्या प्रसिद्धीमुळं कतरीना चांगलीच भडकली होती. रणबीरचे आई-वडील हे फोटो बघून चांगलेच नाराज झाले असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळं आता त्यांच्या साखरपुड्याच्या निर्णयाबाबत ऋषी आणि नीतू कपूर काय म्हणतात, हेच बघावं लागेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, August 29, 2013, 15:16