`फँड्री`नं ओलांडली भाषेची सीमारेषा!, fandry is going to release out of maharashtra

`फँड्री`नं ओलांडली भाषेची सीमारेषा!

`फँड्री`नं ओलांडली भाषेची सीमारेषा!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि झी टॉकिज प्रस्तुत `फँड्री` सिनेमाने उंच भरारी घेतलीय. महाराष्ट्रात मिळत असलेल्या तुफान यशानंतर `फँड्री` हा सिनेमा आता महाराष्ट्राबाहेरही रिलीज होणार आहे.

येत्या २८ फेब्रुवारीपासून गुजरात, मध्यप्रदेश आणि गोव्यासह १२ राज्यांमध्ये फँड्री रिलीज होणार आहे. जब्या आणि शालूची ही अनोखी प्रेमकहाणी आता महाराष्ट्राबाहेरही प्रेक्षकांचं मनं जिंकणार का? याचीच उत्सुकता आहे.

पारंपरिक मराठी चित्रपटांच्या चौकटी मोडून काढणाऱ्या फँड्रीने पहिल्या तीन दिवसात दीड कोटी रूपयांचा गल्ला पार केलाय. फॅण्ड्री १४ तारखेला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित झाला आणि मुंबई, पुणे, नाशिक आणि सोलापूरमध्ये पहिल्या दिवसापासून या सिनेमाने हाऊसफुल्ल राहण्याचा मान मिळवला आहे. समीक्षकांना आवडणारे चित्रपट हे कलात्मक असल्याने प्रेक्षकांना ते आवडत नाहीत, असा समज फँड्रीने खोडून काढला आहे. महाराष्ट्रातील १६३ चित्रपटगृहात फँड्रीचे दिवसाला २७५ शो सुरू आहेत. फँड्री हा मराठीत सिनेमा बनवण्याची इच्छा असणाऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 17:36


comments powered by Disqus