‘बोल्ड’ अभिनेत्रीने म्हटले मी नरेंद्र मोदींची मुलगी!, Film Actress Avni Said I Daughter Of Narendra Modi

‘बोल्ड’ अभिनेत्रीने म्हटले मी नरेंद्र मोदींची मुलगी!

‘बोल्ड’ अभिनेत्रीने म्हटले मी नरेंद्र मोदींची मुलगी!


www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
दक्षिण भारतसह सिंगापूर आणि मलेशियाच्या सिनेमागृहात ज्या अभिनेत्रीचे चित्रपट हंगामा करतात. जिच्या पहिल्या चित्रपटाच्या यशाने दक्षिणेच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या पोटातं दुखू लागलं. ती अवनि मोदी म्हणते नरेंद्र मोदी माझे वडील आहे. अवनि गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यात वास्तव्याला आहे.

अवनिला लहानपणापासून अभिनयाची आवड होती. परंतु, कॉलेजपर्यंत ती अभिनयात आपला ठसा उमटवू शकली नाही. एकदा कॉलेजमधील एका स्क्रिप्ट रायटरने अवनिला सांगितले होते की, तुला अभिनयातील अ सुद्धा येत नाही. शाळा आणि कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या गर्दीत हरवलेली अवनि आज तामिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये गुजरातचं नाव काढते आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अवनि एक ब्रँड झाली आहे. अवनिचे आडनावही मोदी आहे आणि देशात सध्या नरेंद्र मोदी यांची धूम आहे. त्यामुळे अवनिचे मोदी आडनाव तिला एक वेगळीच ओळख देते. साऊथची संपूर्ण इंडस्ट्री मला मिस मोदीच्या नावाने ओळखते.

एक मजेदार किस्सा सांगताना अवनि म्हणाली, काही दिवसापूर्वी चित्रपट प्रमोशनसाठी मी बंगुळूरूला गेली होती. त्यावेळी इंग्रजी वृत्तपत्राच्या एका पत्रकाराने विचारले, मिस मोदी, नरेंद्र मोदींशी तुमचे काही कौटुंबिक नाते आहे का? त्यावेळी मी म्हणाले, नरेंद्र मोदी माझ्या सख्खे नातेवाईक नाही, पण त्या पेक्षाही मोठ्या स्थानावर आहे. मी नरेंद्र मोदींची मुलगी आहे. एकटी मीच नाही तर गुजरातच्या सर्व मुली नरेंद्र मोदींच्या मुलीसारख्या आहेत.

मोदी यांचे प्रतिमा निष्कलंक आहे. त्यांचे चारित्र्य दमदार आहे. ते प्रतिभावान आणि प्रभावसाली आहे. त्यामुळे मला ते पितृतुल्य वाटतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, June 21, 2013, 18:34


comments powered by Disqus