`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`, films are not meant to make actresses look beautiful

`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`

`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात` असं परखड मत व्यक्त केलंय अभिनेत्री कंगना रानौत हिनं...

क्वीन, रिव्हॉल्वर रानी यांसारख्या सिनेमांतून वेगवेगळ्या पण ठोस भूमिकांतून प्रेक्षकांसमोर उभ्या राहिलेल्या कंगणानं फारसं ग्लॅमर नसलेल्या भूमिकांही करण्यास काही हरकत नसल्याचं यावेळी सांगितलंय. सिनेमामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळाली तर अशा भूमिकांचाही नक्कीच विचार करेन... असं कंगनानं म्हटलंय.

एका टीव्ही चॅनलच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कंगना राजधानी दिल्लीत उपस्थित झाली होती.

ग्लॅमरच्या क्षेत्रात काम करणाऱ्या 27 वर्षीय कंगनाच्या म्हणण्यानुसार, या क्षेत्रात हिरोईन्सनं पडद्यावर केवळ सुंदर दिसावं असा भ्रम आहे. कंगना म्हणते, सिनेमे केवळ हिरोईन्सची सुंदरता प्रदर्शित करण्यासाठी नसतात. सिनेमांमध्ये कथानक ही अत्यावश्यक गोष्ट आहे... जर ती असेल तर कोणतीही तिथे कोणतीही हिरोईन काम करू शकते.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री कंगनानं, `रिव्हॉल्वर रानी` या चित्रपटाबद्दल आपण अगोदर साशंक होतो, हेही स्पष्टपणे सांगितलं. यामागचं कारण म्हणजे समाजात असे सिनेमे फार कमी वेळा स्वीकार केले जातात, असं तिनं म्हटलंय. या पुरस्कार समारंभात कंगनाला अभिनेता आमिर खानच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, नुकतंच अभिनेत्री सोनम कपूर हिनं अगदी कंगनाच्या विरुद्ध वक्तव्य केलं होतं. जर कुणी सुंदर नसेल तर त्याला बॉलिवूडमध्ये चांगला कलाकार समजलं जातं, असं वक्तव्य सोनमनं एका टीव्ही शो दरम्यान बोलताना केलं होतं.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 21:59


comments powered by Disqus