...आणि प्रियांकानं शाहरुखला धुडकावून लावलं!, finally priyanka says `no` to shahrukh....

...आणि प्रियांकानं शाहरुखला धुडकावून लावलं!

...आणि प्रियांकानं शाहरुखला धुडकावून लावलं!
www.24taas.com, मुंबई

प्रियांका चोप्राला एकावेळी एकापेक्षा जास्त सिनेमे करताना अनेकांनी पाहिलंय... त्या सिनेमांच्या शुटींगसाठी मग रात्रीचे दिवस अन् दिवसाची रात्र करायलाही तयार असते. तसंच शाहरुखची आणि तिची ‘मैत्री’ लक्षात घेता तीनं शाहरुखबरोबर काम करण्यास दिलेला नकार अनेकांना पचत नाहीए.

होय, यावेळेला प्रियांकानं चक्क शाहरुख खानसोबत काम करण्यास नकार दिलाय. प्रियांकाला एकता कपूरचा ‘मिलन टॉकीज’ आणि फराह खानचा ‘हॅप्पी न्यू इअर’ या दोन सिनेमांची ऑफर एकाच वेळेला मिळाली होती. एकावेळी एकच सिनेमा करता येणं शक्य होतं. फराह खान आणि शाहरुख खान निश्चिंत होते की प्रियांका तर त्यांना कधी ‘नाही’ म्हणणार नाही. पण, यावेळी मात्र प्रियांकानं दोघांनाही निराश केलं.

खरं म्हणजे, ‘हॅप्पी न्यू इअर’साठी फराहाला शाहरुखनंच प्रियांकाचं नाव सुचवलं होतं. प्रियांका आणि शाहरुखची पडद्यावरची केमिस्ट्री हीट असल्यानं फराहनंही लगेचच हो म्हटलं. पण, प्रियांकानंच नकार दिल्यानं आता तिला पर्याय शोधावा लागणार आहे.

शाहरुख – प्रियांकाच्या ‘मैत्री’बद्दल विविध चर्चांना आता प्रियांका कंटाळलीय. त्यापासून दूर राहण्याचा ती सतत प्रयत्न करतेय. तसंच ‘मिलन टॉकीज’मधील तिची भूमिकाही तिला भावली. या सिनेमात तिच्यासोबत आहे इमरान खान.

शाहरुखला सध्या, तरी त्याला हा धक्का पचवण्यास वेळ लागतोय... मात्र हा नकार त्याच्या किती पचनी पडेल हे येत्या काही दिवसांत कळेलच...

First Published: Saturday, March 2, 2013, 10:44


comments powered by Disqus