`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद, First Look: Mallika Sherawat in tricolour in `Dirty Politics

`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...

`डर्टी पॉलिटिक्स`चा फर्स्ट लूक आणि वाद...

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावतचं नाव असेल आणि तिथे वाद-विवाद झाला नाही, तरच आश्चर्य... आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा तिनं मोठ्या पडद्यावर एन्ट्री घेतलीय त्यासोबतच एक नवा वाद उभा राहिलेला दिसलाय. आत्ताही काही वेगळी स्थिती नाही.

मल्लिका शेरावत हिच्या आगामी ‘डर्टी पॉलिटिक्स’ या सिनेमाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. पण, त्यामुळे सिनेमा दाखल होण्यापूर्वीच एका नव्या वादानं जन्म घेतलाय. कारण, या पोस्टरवर मल्लिका शेरावत एक सीडी घेऊन एका अँम्बेसेडर गाडीवर बसलेली दिसतेय... आणि तिनं केशरी, सफेद आणि हिरव्या रंगाचं एक कापड आपल्या अंगाभोवती गुंडाळलंय.... आणि यामुळेच पडलीय वादाची थिनगी...

मल्लिकाविरुद्ध काही राजकीय पक्षांनी जोरदार प्रदर्शन करणंही सुरू केलंय. पण, तिरंग्यासारखं दिसणारं हे केशरी, सफेद आणि हिरव्या रंगाचं कापड भारताचा झेंडा आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्यावर अशोकचक्र नाही... मल्लिकाचा लूक उत्तेजक आहे परंतु आम्ही झेंड्याचा अपमान केलेला नाही, असा युक्तीवाद काही सिनेमा निर्मात्यांकडून केला जातोय.

‘डर्टी पॉलिटिक्स’ हा राजस्थानमधील चर्चित भंवरी देवी हत्याप्रकरणावर आधारलेला चित्रपट असल्याचं सांगितलं जातंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 31, 2014, 23:09


comments powered by Disqus