Last Updated: Saturday, October 20, 2012, 22:21
माणसांच्या जखमांवर मीठ चोळणा-या कर्नाटक सरकारला शनिवारी सणसणीत चपराक बसली. बेळगाव तालुका पंचायतीवर ‘मराठी झेंडा’ डोलाने फडकला. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रताप कोळी यांनी बाजी मारली. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली, तर समितीच्याच रिता बेळगावकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.