सनी लिऑनची कतरिनाला धोबीपछाड Forget Kat, search Sunny

सनी लिऑनची कतरिनाला धोबीपछाड

सनी लिऑनची कतरिनाला धोबीपछाड
www.24taas.com, मुंबई

पॉर्नस्टार सनी लिऑनचा जिस्म-२ सिनेमा बॉक्स ऑफिसवर आदळला. सनी लिऑनला अभिनय अजिबात जमत हे देखील सिद्ध झालं. तरीही इंटरनेटच्या जगात मात्र २०१२मध्ये सर्वाधिक सर्च झालेली सेलिब्रिटी सनी लिऑनच ठरली आहे. डिसेंबर २०१२ मध्ये ३.५ कोटी लोकांनी इंटरनेटवर सनी लिऑनला सर्च केलं.

सनी लिऑनच्या आधी कतरिना कैफ ही इंटरनेटवरील स्रवाधिक शोधली जाणारी सेलिब्रिटी होती. मात्र सनी लिऑनने कतरिनाला मागे टाकत पहिला नंबर पटकावला आहे. जेव्हा सनी लिऑनच्या नावाने साडेतीन कोटी लोकांनी सर्च केलं गेलं, त्यावेळी कतरिना कैफसाठी फक्त १.६ कोटी लोकांनी सर्च केलं. हा आकडा सनी लिऑनला सर्च करणाऱ्यांच्या संख्येत निम्याहून कमी आहे.

बॉलिवूडचे हिरो शाहरुख खान, सलमान खानही सनी लिऑनपुढे फिके पडले आहेत. सलमान खानला १ कोटी लोकांनी सर्च केलं, तर शाहरुख खानला फक्त ४८ लाख लोकांनी सर्च केलं. या बातमीवर सनी लिऑनने प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या बातमीमुळे तिला नक्कीच आनंद झाला असणार. सनी लिऑन सध्या एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस-२’ च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

First Published: Tuesday, February 19, 2013, 17:49


comments powered by Disqus