राजीव पाटील यांच्यावर आज नाशकात अंत्यसंस्कार Funeral of Director Rajiv Patil in Nashik today

राजीव पाटील यांच्यावर आज नाशकात अंत्यसंस्कार

राजीव पाटील यांच्यावर आज नाशकात अंत्यसंस्कार
www.24taas.com , झी मीडिया, नाशिक

आपल्या सगळ्या सिनेमांमधून सामाजिक भान जपणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते तरूण मराठी दिग्दर्शक राजीव पाटील यांचं काल ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आज त्यांच्या नाशिकमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणारेय. त्यांच्या निधनामुळम सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होतेय.

राजीव पाटील यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यामुळं निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. मुंबईतील भगवती रुग्णालयात त्यांचं निधन झालं. ७२ मैल-एक प्रवास हा त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

सावरखेड एक गाव या सिनेमापासून राजीव पाटील यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. मराठीतील साहित्यकृतींवर चित्रपट बनवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. सनई-चौघडे, पांगिरा, जोगवा हे त्यांचे चित्रपट गाजले होते. जोगवा चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला होता. `वंशवेल` या नव्या सिनेमाचं ते दिग्दर्शन करत होते.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 1, 2013, 08:39


comments powered by Disqus