व्हिडिओ पाहा : माधुरीचा ‘देढ इश्किया’तला डान्स तडका, ‘Hamari Atariya Pe’ song from ‘Dedh Ishqiya’: W

व्हिडिओ पाहा : माधुरीचा ‘देढ इश्किया’तला डान्स तडका

व्हिडिओ पाहा : माधुरीचा ‘देढ इश्किया’तला डान्स तडका

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गुलजार, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज आणि माधुरी दीक्षित एकत्र आले तर काही तरी चांगलंच पाहायला मिळेल, याची प्रत्येकालाच खात्री आहे... आणि याचाच हा एक नमुना...

एका गाण्याच्या निमित्तानं ही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज एकत्र आले... अभिषेक चौबे निर्मित ‘देढ इश्किया’ या सिनेमातील ‘हमारी अटारिया...’ हे गाणं माधुरीवर चित्रीत करण्यात आलंय. या गाण्याच्या निमित्तानं माधुरीचं क्लासिकल संगीतावरचं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलंय.

‘डान्स गुरु’ म्हणून ओळखला जाणारा रेमो डिसूझा यानं या गाण्यावर माधुरीला आपल्या मोहक अदा सादर करण्याची पुरेपूर संधी दिलीय.

‘देढ इश्किया’ या सिनेमात हुमा कुरेशी, अर्शद वारसी आणि नसरुद्दीन शाह या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.

व्हिडिओ पाहा :- ‘हमारी अटारिया...’





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 3, 2013, 10:49


comments powered by Disqus