माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस

Last Updated: Thursday, May 15, 2014, 13:48

धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिने वयाचे 46 वर्ष पूर्ण केली आहेत. माधुरीने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती अनेक अभिनेत्रींची आयकॉन झाली आहे. तिने 1980-90 च्या दशकात नृत्य और स्वाभाविक अभिनयाच्या जोरावर आपली छाप पाडली.

सौंदर्य आणि अदाकारीचा अनोखा संगम – गुलाब गँग

Last Updated: Friday, March 7, 2014, 18:36

गुलाब गँग हा एका सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट आहे. ऍक्शनने आणि मारधाडीने ओथंबून वाहणारा हा चित्रपट विशेष करून महिला प्रधान आहे.

‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

Last Updated: Friday, March 7, 2014, 08:47

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’ सिनेमावरील बालंट टळले आहे. त्यामुळे हा चित्रपट आजपासून देशात प्रदर्शित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने या सिनेमावरील बंदी उठवली आहे.

अधिकाऱ्यांनी माधुरीला दिलं हाकलून...

Last Updated: Monday, March 3, 2014, 13:01

नुकतंच, माधुरीला एका धक्कादायक घटनेला सामोरं जावं लागलंय. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता ती आली असताना तिला अधिकाऱ्यांनी चक्क एअरपोर्ट व्हीआयपी लाऊंजमधून बाहेर काढलं...

...तर मी अण्णांप्रमाणे उपोषणाला बसेन : संपत पाल

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 22:15

येत्या ७ मार्चला माधुरीचा `गुलाबी गँग` प्रदर्शित होतोय. जसजशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येतेय तसतसा संपत पाल यांचा पारा वाढत चाललाय. `माझ्या परवानगीशिवाय चित्रपट प्रदर्शित केला तर मी अण्णा हजारेंसारखी उपोषणाला बसेन` असा पवित्रा संपत पाल यांनी घेतलाय.

`गुलाब गँग`मुळे माधुरी, जुहीच्या अभिनयात तुलना

Last Updated: Sunday, January 19, 2014, 23:56

अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जुही चावला गुलाब गँग चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा एकाच चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. म्हणून जुही आणि माधुरी यांच्या अभिनयाची तुलनाही सुरू झाली आहे.

माधुरी सोबत नव्हतं करायचं काम- जुही चावला

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 11:10

अभिनेत्री जुही चावला जी पहिल्यांदाच माधुरी दीक्षित सोबत ‘गुलाब गँग’ चित्रपटात झळकणार आहे. ती म्हणते, की पहिले तिला माधुरी दीक्षितसोबत करायचं नव्हतं आणि भविष्यातही करेल असं वाटत नाही. माधुरी दीक्षित आणि जुही चावला या नव्वदच्या दशकातल्या स्पर्धक अशा अभिनेत्री आहेत आणि त्यांनी कधीही एकत्र चित्रपटात काम केलं नव्हतं.

फिल्म रिव्ह्यू : 'बोल्ड रोमान्स`ची साच्याशिवाय कहाणी!

Last Updated: Saturday, January 11, 2014, 10:32

प्रेम, रोमान्स, अफेअर... एकाच साच्यातल्या गोष्टी वेगवेगळ्या रंगानं आणि ढंगानं प्रेक्षकांसमोर सादर करणं हीच तर बॉलिवूडची खासियत... शुक्रवारी रिलीज झालेला ‘डेढ इश्किया’मधलं प्रेमही असंच काहिशा वेगळ्या रंगात सादर करण्यात आलंय.

अहो आश्चर्यम... सलमान खानला शाहरुखचा पाठिंबा

Last Updated: Friday, January 10, 2014, 12:17

सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.

माधुरीच्या `गुलाब गँग`चा ट्रेलर आला रे आला....

Last Updated: Friday, January 10, 2014, 11:16

गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा असलेला माधुरी दीक्षितचा गुलाब गँग याच चित्रपटाचा प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. प्रमुख भूमिकेत माधुरी दीक्षित असून जुही चावला आणि माधुरीने प्रथमच काम केले आहे.

बेगम माधुरीचा डेढ इश्किया आज भेटीला

Last Updated: Friday, January 10, 2014, 10:45

या विकेण्डला तुमच्या भेटीसाठी येत आहेत दोन हिंदी आणि एक मराठी सिनेमा... यामध्ये धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा बहुप्रतिक्षीत डेढ इश्कियाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तर 1909 हा मराठी सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय...

सैफई महोत्सवात अवतरलं बॉलिवूड!

Last Updated: Thursday, January 9, 2014, 16:07

सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.

खबरदार! परवानगीशिवाय माधुरीचा `गुलाब गँग` प्रदर्शित केला तर ...

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 12:18

माधुरी दीक्षितचा अभिनय असलेला सिनेमा`गुलाबी गँग` हा सिनेमा बुलेलखण्डमधील `गुलाबी गँग`च्या जीवन-संघर्षावर आधारीत आहे.

... आणि माधुरी दीक्षित लाजली, सल्लू मियाँची कमाल!

Last Updated: Tuesday, December 10, 2013, 14:08

‘बीग बॉस ७’च्या सीजनमध्ये सलमानची धमालगिरी चालू असताना आता त्यांच्यात भर टाकण्यासाठी चक्क माधुरी दीक्षित ही बीग बॉसच्या सेटवर आली. यावेळी सलमान आणि माधुरीचा डान्स बघून सर्व प्रेक्षक हैराण झाले. माधुरी दिक्षीत ही तिच्या येणाऱ्या अगामी चित्रपट ‘डेढ इश्किया’ च्या प्रमोशनसाठी बीग बॉसच्या घरी पोहचली होती.

व्हिडिओ पाहा : माधुरीचा ‘देढ इश्किया’तला डान्स तडका

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 10:49

गुलजार, रेखा भारद्वाज, विशाल भारद्वाज आणि माधुरी दीक्षित एकत्र आले तर काही तरी चांगलंच पाहायला मिळेल, याची प्रत्येकालाच खात्री आहे... आणि याचाच हा एक नमुना...

पाहाः देढ इश्किया’चा ‘हॉट' ट्रेलर

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 21:23

ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या अभिनयातील जिवंतपणा आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे `देढ इश्किया` या चित्रपटात त्यांच्यासोबत `तो` सीन करताना मी कावरीबावरी झाले, अशी कबुली `धक धक` गर्ल माधुरी दीक्षित हिने दिली आहे.

‘तसा’ सीन करताना माधुरी झाली कावरीबावरी

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 13:52

ज्येष्ठ अभिनेता नसरुद्दीन शहा यांच्या अभिनयातील जिवंतपणा आणि चेहऱ्यावरील हावभावामुळे `देढ इश्किया` या चित्रपटात त्यांच्यासोबत `तो` सीन करताना मी कावरीबावरी झाले, अशी कबुली `धक धक` गर्ल माधुरी दीक्षित हिने दिली आहे.

शाहरुख-माधुरीचं ‘टेम्प्टेशन रिलोडेड’!

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 17:39

बॉलिवूडच्या तारे तारकांचे चाहते जगभर पसरले असून त्याचा प्रत्यय बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि धकधक गर्ल माधुरी यांना ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडमध्ये आला.

‘गुलाब गँग’मध्ये माधुरी करणार ढुशूम-ढुशूम!

Last Updated: Thursday, September 26, 2013, 09:30

माधुरी दीक्षित ‘गुलाब गँग’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमातून माधुरीचा हटके लूक पहायला मिळणार आहे.

माधुरी दीक्षितला पितृशोक

Last Updated: Friday, September 13, 2013, 22:49

अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिचे वडील शंकर दीक्षित(वय ९१) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

सलमानला माधुरीने नाचवले

Last Updated: Friday, August 30, 2013, 16:44

बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करणाऱ्या ‘बिग बॉस-७’ या शोच्या प्रमोशनसाठी सलमान जोरदार सराव करीत आहे. तसेच तो रियालिटी शो ‘झलक दिखला जा’मध्ये दिसणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या मंचावर त्याने खूप धम्माल तर केलीच पण धक-धक गर्लसोबत ठुमके लगावले आहेत. चक्क माधुरीने सल्लूला नाचवलं.

माधुरी आणि श्रीदेवीत रंगतेय टशन

Last Updated: Thursday, August 22, 2013, 14:51

मिलिअन डॉलर स्माईल असलेली माधुरी दीक्षित आणि हवाहवाई श्रीदेवीमध्ये सध्या टशन पहायला मिळतेय. झोया अख्तरच्या आगामी सिनेमातल्या भूमिकेसाठी या दोघींमध्ये स्पर्धा असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगतेय.

आता माधुरी बनणार ‘रज्जो’

Last Updated: Sunday, August 4, 2013, 18:54

धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच वेगळ्या भुमिकेतून आपल्यासमोर येत असून नवीन काहीतरी देण्यांचा प्रयत्न करते, त्याचप्रमाणे ती आता ‘गुलाब गँग’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात ती शक्तीशाली रज्जोच्या भूमिकेत आहे.

माधुरीची आणखी एक म्युझिकल ट्रीट?

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 14:53

कोरिओग्राफरच्या भूमिकेतून डायरेक्टरच्या भूमिकेत शिरलेला रेमो डी’सूजा याला आता माधुरीला घेऊन एक सिनेमा बनवायचाय.

‘डेढ़ इश्किया’मध्ये नसरूद्दीन-माधुरी विचित्र दृश्यात!

Last Updated: Sunday, June 2, 2013, 09:50

अभिनेत्री विद्या बालन अभिनीत ‘इश्किया’ चा सिक्वल ‘डेढ इश्किया’मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित अभिनेता नसरुद्दीन शाहसह काही विचित्र दृश्य करणार आहे.

माधुरीला `किस` करण्यासाठी रणबीरची धडपड!

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 18:36

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या गालांवर किस करायला मिळावं, यासाठी अभिनेता रणबीर कपूरने दिग्दर्शक अयान कपूरला चक्क लाच दिली, असं खुद्द रणबीर कपूरनेच उघड केलं आहे.

माधुरी दीक्षित करणारं ‘मुजरा’

Last Updated: Sunday, May 12, 2013, 15:45

लाखो दिलो की धडकन् असलेली माधुरी दिक्षित जेव्हापासून मायदेशी आली आहे तेव्हापासून ती तिच्या फॅन्सना धक्केच देत आहे.माधुरीने आपल्या करिअर सोबत वेगवेगळे प्रयोग करण्याचा तिने जणू निर्धारचं केला आहे.

तुमच्या घरी बसून शिका `माधुरी`कडून डान्स....

Last Updated: Saturday, March 2, 2013, 09:26

अभिनेत्री माधुरी दीक्षितनं एक ऑनलाईन डान्स अकादमी सुरू केलीय. स्वत:तला आणि प्रेक्षकांमधल्या समन्वयाचा धागा म्हणून ती या ऑनलाईन डान्स अकादमीकडे पाहतेय.

माधुरी दीक्षित- अनिल कपूर आले एकत्र

Last Updated: Wednesday, December 5, 2012, 12:27

लाखो दिलो की धडकन असणारी माधुरी दीक्षित आणि एकेकाळचा चार्मिंग बॉय अनिल कपूर यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री फारच गाजली होती.

अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 00:16

बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.

माधुरी कोणाला म्हणाली 'नॉनसेन्स'?

Last Updated: Sunday, July 22, 2012, 12:59

अभिनेत्री माधुरी दीक्षित आज होणा-या या रक्तदान शिबिराला उपस्थित आहे. यापूर्वी राज्य सरकारचा पुरस्कार स्वीकारायला माधुरी आली नव्हती तेव्हा अजित पवार यांनी भाषणात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर माधुरीने चक्क उपस्थिती लावली आहे. तर या आधी माधुरी मीडियावर घसरली होती. 'नॉनसेन्स' असा उल्लेख केला होता.

माधुरीचे डॉ. नेने सरकारी हॉस्पिटलमध्ये...

Last Updated: Wednesday, July 18, 2012, 16:00

'धक धक गर्ल' माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने हे आता गरिबांच्या ह्रदयाची धकधक तपासणार आहेत... तेही परळच्या ‘केईएम’ या सरकारी हॉस्पिटलमध्ये...

माधुरीने घातली उद्धव ठाकरेंना गळ

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 22:26

धकधक गर्ल माधुरी दीक्षितला मुंबईत डान्स अकादमी सुरू करायची आहे. यासाठी वांद्रे ते दहिसर दरम्यान भूखंड मिळविण्यासाठी माधुरी प्रयत्नशील आहे. पालिकेचा भूखंड मिळावा, यासाठी माधुरीने थेट शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनाच गळ घातली आहे.

माधुरीला 'थिरकण्यासाठी' मुंबईत हवा 'भूखंड'

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 13:59

एक, दो, तीन, म्हणत ज्या माधुरीने आपल्या डान्सच्या जोरावर साऱ्यांनाच थिरकायाला भाग पाडलं. त्यामुळे साऱ्यांचाच मनावर माधुरीच्या डान्सची 'मोहिनी' होती. माधुरी आणि डान्स याचं नातं फार जवळचं आहे.

नसिरुद्दीनचं 'माधुरी' वेड...

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 10:31

‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितसोबत काम करायला कुणाला आवडणार नाही! हीच इच्छा आहे ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची... आणि त्यांची ही इच्छा लवकरच पूर्णही होतेय. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘देढ इश्किया’ या आगामी चित्रपटात लवकरच हे दोघं एकत्र काम करताना दि

माधुरी दीक्षित-नेने @ 47

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 12:50

सर्वांच्या लाडक्या ‘धकधक गर्ल’ माधुरीचा दीक्षित-नेनेचा आज वाढदिवस... आज ती ४७ वर्षांची झालीय. आजही अनेक जण माधुरीच्या एका हास्यावर फिदा आहेत. आजही अनेकांच्या हद्याची धकधक वाढविणारी माधुरी ४७ वर्षांची झालीय, यावर कदाचित अनेकांचा विश्वासही बसणार नाही.

पुन्हा दिसणार माधुरीची 'झलक'

Last Updated: Friday, May 4, 2012, 16:54

‘झलक दिखला जा’चं पाचवं पर्व लवकरच सुरू होणार आहे आणि या पर्वातही परीक्षक म्हणून डान्सिंग दिवा माधुरी दीक्षित आपली जादू दाखवणार आहे. ‘झलक दिखला जा’ या शोमध्ये या आधीच्या सीझनमध्येही माधुरीने आपल्या डान्सची अनोखी झलक दाखवली.

माधुरीला आंबा खावासा वाटतोय!

Last Updated: Thursday, May 3, 2012, 17:48

अभिनेत्री माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये अधिराज्य गाजवले. मात्र, लग्नानंतर अमेरिकेची वाट धरली. परंतु तिथे मन न रमल्याने ती पुन्हा भारतात परतली. आता मुंबईत आल्यानंतर तिला आंबा (हापूस) खावासा वाटत आहे. दोन मुलांची आई झाल्यानंतर माधुरीला आंबा खायचे आहे, हे खुद्द माधुरीने टि्वट केले आहे.

महाराष्ट्रासाठी माधुरी कडूच

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 11:21

मराठी मुलगी म्हणवणा-या माधुरीनं तर चक्क १० कोटी रुपयांच्या घसघशीत मानधनाची मागणी केल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे तर शुटिंग दरम्यान फाईव्ह स्टार हॉटेलचा स्टेदेखील तिला हवाय. तिच्या मागणीनं मात्र महाराष्ट्र सरकारचे डोळेच पांढरे झाले आहेत.

माधुरी दीक्षित ‘गॅँगस्टर’

Last Updated: Saturday, April 28, 2012, 14:16

‘धक धक’फेम माधुरी दीक्षित-नेने बॉलीवूडमध्ये दुसरा डाव खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आधीच्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी गुलाब नावाच्या ‘गॅँगस्टर’ची प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर ‘इश्किया’च्या सिक्वलच्या निमित्ताने माधुरी दीक्षित प्रथमच विशालच्या टीमसोबत काम करणार आहे.

माधुरी दीक्षित बनणार 'श्यामची आई'

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 14:22

'श्यामची आई' पुन्हा आपल्या भेटीस येणार आहे. आणि याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नव्या श्यामची आईमध्ये आईची भूमिका साकारणार आहे माधुरी दीक्षित. महेश मांजरेकर यांनी श्यामची आईवर सिनेमा काढण्याचा निश्चय केला आहे. यामध्ये श्यामच्या आईच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षितला विचारण्यात आलं आहे.

गुढीपाडवा : बिग बी, माधुरी, रितेशच्या शुभेच्छा

Last Updated: Friday, March 23, 2012, 15:33

आपल्या चाहत्यांना पाडवा सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी बॉलिबूडमधील स्टार मंडळीनी ट्विट केले आहे. यात अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांचा समावेश आहे. नुतन मराठी वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना म्हटले आहे. गुड लक, हा सण समृद्धी आणि खूशीचा जावो.

आणखी एक माधुरी दीक्षित!

Last Updated: Thursday, March 8, 2012, 16:19

बॉलिवूडसकट सर्व मराठी मनांसाठी खूशखबर! बॉलिवूडची प्रख्यात ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित-नेने हिच्या मेणाच्या पुतळ्याचे अखेर बुधवारी लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये अनावरण झाले.

माधुरीच्या पुतळ्याचं ७ मार्चला आनावरण

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 16:14

माधुरी दीक्षितच्या बहुचर्चित मेणाच्या पुतळ्याचे अनावरण ७ मार्च रोजी लंडनमधील मादाम तुसाँमध्ये होणार आहे. माधुरी दीक्षित हिने ट्विट करुन ही बातमी घोषित केली आहे. माधुरी दीक्षित काही दिवसांपूर्वीच डेनेव्हर सोडून पुन्हा मुंबईला स्थायिक झाली आहे.

माधुरी दीक्षितची 'वेबसाइट' सुरू

Last Updated: Wednesday, February 1, 2012, 15:52

माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. आपली स्वतःची वेबसाईट असलेल्या स्टार्सच्या यादीत आता माधुरी दीक्षितचीही भर पडली आहे. माधुरी दीक्षितने स्वतःची वेबसाईट सुरू केली आहे.

माधुरीचा 'मधुर' योग

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 11:40

नुकतीच मधुर भांडारकरने माधुरीची भेट घेतल्याची न्यूज चर्चेत आहे. जर खरंच माधुरीने मधुरचा सिनेमा करण्यासाठी होकार दिला तर एक चांगली कलाकृती आपल्याला सिल्व्हर स्क्रीनवर पाहायाला मिळेल.

धकधक गर्ल धडकली मुंबईत..

Last Updated: Saturday, October 8, 2011, 16:31

लाखो दिलो की धडकन, म्हणजेच आपली धकधक गर्ल माधुरी दिक्षीत– नेने ही मुंबईत परतली आहे ते सुद्धा कायमची. माधुरीने संपूर्ण कुटूंबाबरोबर मुंबईत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. कॉन्टिनेन्टल फ्लाईट- 48 या विमानानं माधुरी मुंबईतल्या विमानतळावर पोहोचली आणि चाहत्यांनी एकच जल्लोष केला.