Last Updated: Sunday, October 28, 2012, 08:49
www.24taas.com, मुंबई६४व्या वर्षीही हेमा मालिनींचं सौंदर्य अबाधित आहे. हेमा मालिनीच्या या सौंदर्याचं रहस्य काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द हेमा मालिनी देणार आहेत... ते ही पुस्तकरुपाने.
फिटनेस तज्ज्ञ नमिता जैन यांनी लिहिलेल्या ‘सेक्सी सिक्स्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला आलेल्या हेमा मालिनींनी या प्रसंगी फिटनेसवरील पुस्तक लिहिण्याचा मनोदय व्यक्त केला. “मी स्वतः एक पुस्तक लिहिणार आहे. इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत मी ज्यातून गेले आहे, आणि जे इतर स्त्रियांनाही कळावं असं मला वाटतं, ते मी या पुस्तकातून त्यांच्यासमोर मांडणार आहे” असं हेमा मालिनी म्हणाल्या.
हेमा मालिनी या केवळ एक अभिनेत्री नसून प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. त्या म्हणाल्या, “मी नेहमी नृत्य करत असते.यामुळेच मी या वयातही फिट दिसते. तसंच मी थोडा व्यायाम आणि थोडा फार ‘योगा’ही करते. त्यामुले मी कायम सकारात्मक विचार करते. हेच माझ्या फिटनेसचं रहस्य आहे.”
First Published: Sunday, October 28, 2012, 08:49