हुमा कुरैशी इम्रान हाश्मीच्या `त्या` सीनवर चिडली, Huma qureshi and imran hashmi kissing Scene

हुमा कुरैशी इम्रान हाश्मीच्या `त्या` सीनवर चिडली

हुमा कुरैशी इम्रान हाश्मीच्या `त्या` सीनवर चिडली
www.24taas.com, नवी दिल्ली

अभिनेत्री हुमा कुरैशी प्रचंड चिडली... आणि तिच्या चिडण्याचं कारणही तसचं आहे. एक थी डायन या सिनेमात एका दृष्यात हुमाला किस करायचं होतं. आणि त्यामुळेच हुमा प्रचंड नाराज झाली होती. सिनेमा एक थी डायनमध्ये इम्रान हाश्मी आणि हुमा कुरैशी यांच्यात किसींग सीन घेण्यात येणार असल्याचे समजताच हुमा नाराज झाली.

त्यानंतर विशाल भारद्वाजच्या समजावण्यानंतर हुमाचा पारा थोडा थंड झाला. हुमा हा सीन देण्यासाठी अजिबात तयार नव्हती. आणि त्यामुळेच तिने हे दृष्य देण्यास नकार दिला.

सुत्रांच्या माहितीनुसार या सिनेमाच्या कथानकात हा सीन कुठेच नव्हता. मात्र सिनेमाच्या क्लायमेक्स नंतर हा सीन मध्येच टाकण्यात आला आणि त्यामुळेच हुमाला ही गोष्ट आवडली नाही.

First Published: Wednesday, April 3, 2013, 18:21


comments powered by Disqus