Last Updated: Tuesday, July 23, 2013, 13:46
www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली आपल्या बिनधास्त वागण्यानं आणि विधानांनी पूनम पांडे नेहमीच चर्चेत राहिलीय. तिच्या अंगप्रदर्शनावर बरीच चर्चा होते... टीकाही होते. पण, अंगप्रदर्शनातून आपण एकप्रकारे समाजसेवाच करतोय, असं पुनमचं म्हणणं आहे. 'अंगप्रदर्शन करणं किंवा स्वत:ला एक्सपोझ करणं म्हणजे एकप्रकारे समाजसेवा' असं वादग्रस्त विधान आता पूनमनं केलंय.
`नशा` या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी पूनम पांडे म्हणतेय की, 'जर माझ्यामुळे जर लोकांना आनंद मिळत असेल तर ही एक प्रकारची समाजसेवाच आहे. माझे एमएमएस आणि फोटो बघून जर लोकांना आनंद होणार असेल तर ती माझ्याकडून होत असलेली समाजसेवाच आहे'.
'माझ्या अंगप्रदर्शनानं लोकांना आनंद मिळतो. जोपर्यंत माझ्यामुळे लोकांना आनंद मिळतोय तोपर्यंत मी ही समाजसेवा करत राहणार' असं पूनम म्हणतेय. पूनम पांडे हिचा ‘नशा’ हा चित्रपट २६ जुलैला रिलीज होतोय. पूनम पांडेने या चित्रपटात स्वत:ला बऱ्याच प्रमाणात एक्सपोझ केल्याची चर्चा सध्या होतेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 23, 2013, 12:55