मी गरोदर नाही – विद्या बालन, i am not pregnant - vidya balan

मी गरोदर नाही – विद्या बालन

मी गरोदर नाही – विद्या बालन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
फ्लोरिडामध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी न झालेली बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही गरोदर असल्याची चर्चा होत असताना मी गरोदर नाही या केवळ अफवा असल्याचं विद्या बालनने सांगितले आहे.

गरोदर असल्याच्या खोट्या अफवांमुळे विद्या बालन त्रस्त झाली आहे. ती गरोदर असून चित्रपट सोडणार आहे, अशा बातम्या वारंवार ऐकायला मिळत होत्या. याबाबत नाराज होत विद्या बालनने सांगितले की, `माझी तब्येत ठीक नसल्याने काही चित्रपटांचे प्रस्ताव मी स्वीकारले नाहीत.` ती सुजॉय घोषच्या `दुर्गा रानी सिंह` आणि मोहित सुरीच्या `हमारी अधुरी कहानी` या चित्रपटातून बाहेर पडली आहे. त्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

विद्याने सांगितले की, मी गरोदर असल्याच्या अफवांमुळे खरोखरच चिंतीत होते. कुणीही वाट्टेल तेव्हा मला हाच प्रश्न विचारतोय.`


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 19:25


comments powered by Disqus