हनी सिंगच्या निधनाची बातमीने सोशल मीडियात खळबळ

Last Updated: Monday, June 2, 2014, 19:18

सोशल मीडियात खोट्या बातम्या कशा आग लावू शकतात किंवा खळबळ माजवू शकतात याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. यो यो हनी सिंग यांच्या निधनाची बातमी आगीसारखी पसरली.

फोन खणखणला, हर्षदा महिलेजवळ पिशवीत बॉम्ब...

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 16:45

रोहा - दिवा पॅसेंजरमध्ये हर्षदा म्हात्रे नावाची महिला पिशवीत बॉम्ब घेऊन प्रवास करीत आहे, असा निनावी फोन आला. हा फोन रोहा पोलीस ठाण्यात खणखणला. त्यानंतर पोलिसांनी वेगाने सूत्रे हलविलीत. मात्र, ही अफवाच असल्याचे तपासानंतर पोलिसांनी स्पष्ट केले.

रोहा-दिवा पॅसेंजरमध्ये बॉम्बची अफवा

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 14:06

दिवा पॅसेंजर गाडीत बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने रोहा-दिवा गाडी रोहा येथे थांबविण्यात आली. बॉम्बच्या अफवेने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. तर रोहा येथे गाडी थांबवून ठेवण्यात अाल्याने भीतीचे वातावरण होते. दरम्यान, अलिबागहून बॉम्बशोधक पथक रोहा येथे दाखल झाल्यानंतर शोध घेतल्यानंतर बॉम्बची अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अडीच तासानंतर गाडी सोडण्यात आली.

मी गरोदर नाही – विद्या बालन

Last Updated: Monday, May 5, 2014, 19:38

फ्लोरिडामध्ये पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी न झालेली बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन ही गरोदर असल्याची चर्चा होत असताना मी गरोदर नाही या केवळ अफवा असल्याचं विद्या बालनने सांगितले आहे.

दाऊदकडून मृत्यूची अफवा, मी ठणठणीत - छोटा राजन

Last Updated: Saturday, April 26, 2014, 14:36

मला कोणताही आजार नाही. मी चांगला आहे. माझ्या मृत्यूची बातमी दाऊद इब्राहिमकडून पसरविण्यात येत आहे. त्याचाच या मागे हात आहे, असा खुलासा अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन याने केलाय. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

५४ हजाराच्या घराची चौकशी, कारवाई करणार - मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 19:12

पवईसारख्या उच्चभ्रू एरियात केवळ ५४ हजारांमध्ये घर मिळणार, या आशेनं मुंबईकरांनी मंत्रालयाबाहेर लांबच लांब रांगा लावल्या. घरांसाठी अर्ज करण्यासाठी बेघर मुंबईकरांची अक्षरशः झुंबड उडाली. परंतु ही अफवा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय..त्यामुळं स्वस्त घरांचं मुंबईकरांचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलंय. दरम्यान, या अफवा प्रकरणाची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलंय.

पवईत ५४ हजारात घराची अफवा कायम

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:10

पवईमध्ये 54 हजारांत घर मिळणार या अफवेनं मंत्रालयात आज तिसऱ्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आहेत.

हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्बची बोंबाबोंब

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 15:12

हारवर्ड यूनिवर्सिटीमध्ये बॉम्ब ठेवल्याची बोंबाबोंब होताच पूर्ण विद्यापीठ खाली करण्यात आले. तसेच विद्यापीठातील होणारी परीक्षाही रद्द करण्यात आली. बॉम्ब ठेवल्याचे वृत्त समजतात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान, ही अफवा असल्याचे चौकशीनंतर समजले.

मि. बिनच्या आत्महत्येची सोशल साईट्सवर अफवा

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 08:51

जगविख्यात हास्यअभिनेते मि. बिन म्हणजेच अभिनेते रोवन एटकिंसन यांनी आत्महत्या केल्याची बातमी सध्या सोशल साईट्सवर पसरलीय. मात्र ही अफवा असल्याचं स्पष्ट झालंय.

अफवेमुळं घडला अपघात, रेल्वेनं चिरडलं, १८ ठार

Last Updated: Sunday, November 3, 2013, 12:07

आंध्रप्रदेशातील विजयनगरम्‌ जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.

अरे, मी एकदम ठणठणीत – नाना पाटेकर

Last Updated: Saturday, August 31, 2013, 19:50

काही दिवसांपूर्वी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर हॉलीवुडचा सुपरस्टार जॅकी चँगच्या अपघाती मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. पण या सर्व बातम्या खोट्या होत्या. असाच काहीसा प्रकार घडला अभिनेते नाना पाटेकर यांच्या बाबतीत.

मुंबईत बॉम्बची अफवा पसरवणार्‍याला अटक

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 10:22

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवरील रेल्वे नियंत्रण कक्षात सातत्याने फोन करून बॉम्ब असल्याची अफवा पसरवणार्‍या धनवीन बरोटा (४०) याला कुर्ला रेल्वे पोलिसांनी अटक केली.

प्रेमसंबंधाबाबतच्या अफवाच!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 13:55

अभिनेता रणदीप हुड्डानं अदिती राव हैदरीसोबत डेटींगच्या बातम्या नाकारल्या असून आपले कोणासोबतही प्रेमसंबंध नाहीत, असं त्यानं सांगितलं.

... आणि चंद्रात दिसले शिर्डीचे साईबाबा!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 13:45

‘चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले... होय, होय चंद्राच्या प्रतिमेत साईबाबा दिसले…’ असा दावा काही भक्तांनी केला आणि हो हो म्हणता ही खबर साऱ्या गावात पसरली.

जगाला 'त्याच्या' मृत्यूची खंत, पण जॅकी म्हणतो `मी जिवंत!`

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 18:52

मार्शल आर्ट्स चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन हा भारतात चायनिज फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित असताना जगभरात त्याच्या मृत्यूच्या बातमीने खळबळ माजली होती.

शरद पवारांबाबत कोणीही अफवा पसरवू नयेत- पिचड

Last Updated: Thursday, March 28, 2013, 17:31

केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची प्रकृती स्थिर आणि चांगली आहे. कोणीही अफवा पसरवू नयेत आणि त्यावर विश्वासही ठेवू नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली आहे.

अफवा... सृष्टीच्या अंताची

Last Updated: Friday, December 21, 2012, 21:00

सृष्टीच्या अंताच्या अफवा यापूर्वीही पसरवण्यात आल्या होत्या आणि त्या वेळो वेळी खोट्या ठरल्या. पण अशा अफवा का पसरवल्या जातात? ज्या माया कॅलेंडरच्या आधारे अफवा पसरवण्यात आली होती ते माया कॅलेंडर नेमकं काय आहे? पृथ्वीला खरंच धोका संभवतोय का? या सगळ्या प्रश्नांचा हा वेध...

अफवांमुळे पूर्वोत्तरेतील नागरिकांचं मुंबईतून स्थलांतर

Last Updated: Friday, August 17, 2012, 16:36

मुंबईत राहणाऱ्या पूर्वोत्तर राज्यातल्या नागरिकांनीही अफवांचा धसका घेतलाय. मुंबईतूनही पूर्वोत्तर राज्यांतल्या नागरिक आणि विद्यार्थ्यांनी स्थलांतर सुरु केलं आहे.

६,८०० जणांनी सोडलंय बंगळुरू

Last Updated: Friday, August 17, 2012, 07:35

गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही पूर्वेत्तर राज्यांतील हजारो नागरिकांनी बंगळुरूहून अनेक नागरिकांचं पलायन सुरूच आहे. आत्तापर्यंत ६,८०० लोकांना स्थलांतर केल्याचं समजतंय

पसरतायेत दंगल धमक्यांच्या अफवा

Last Updated: Thursday, August 16, 2012, 11:47

आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता धमक्यांची अफवा पसरू लागली आहे. कर्नाटकात राहणाऱ्या ईशान्येतील लोकांवर हल्ले होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.

नक्षलवादी अफवा पसरवतायेत- आबा

Last Updated: Tuesday, May 1, 2012, 23:05

जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवादी अफवा पसरवत असल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ३ लोकप्रतिनिधींसह १२ कार्यकर्त्यांचे अपहरण केलं.

नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी

Last Updated: Friday, March 2, 2012, 09:08

मंकी मॅन आणि चड्डी बनियान टोळीच्या अफवांनी मुंबईकर पुरते दहशतीखाली आहेत आणि त्यातूनच चोर सोडून भलत्याच लोकांना मारहाणीचे प्रकारही वाढले आहेत. असे असताना नक्की काय! मंकी मॅन की चड्डी बनियान टोळी, याचीच चर्चा जोर धरू लागली आहे. दरम्याना, मंकी मॅनच्या अफवा पसरवणारी टोळी असू शकते, असे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुण्यात संशय व्यक्त केला आहे. पोलीस या टोळीचा छडा लावतील असं त्यांनी गुरुवारी सांगितलं.

प्रेग्नंसीच्या अफवेचा करीनाने केला इन्कार

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 16:52

गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर प्रेग्नंट असल्याची चर्चा ज्याच्या त्याच्या तोंडी होती. बेबो एअरपोर्टवरून येत असताना आपलं पुढे आलेलं पोट जाणून-बुजून लपवत असल्याचा फोटोही सगळीकडे प्रसिद्ध झाला होता.

पोस्ट ऑफीसमध्ये अफवांची झुंबड

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 09:22

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकमध्ये अफवांचं पेव फुटलय. केंद्र सरकार निवृत्तीवेतन तसचं दहा हजार रुपये देणार अशा अफवेमुळे नाशिकमधील पोस्ट ऑफीसेसमध्ये तुडुंब गर्दी होतीय.