Last Updated: Saturday, August 31, 2013, 19:50
www.24taas.com, झी मीडिया, पुणेकाही दिवसांपूर्वी बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. त्यानंतर हॉलीवुडचा सुपरस्टार जॅकी चँगच्या अपघाती मृत्यू झाल्याची बातमी पसरली होती. पण या सर्व बातम्या खोट्या होत्या. असाच काहीसा प्रकार घडला अभिनेते नाना पाटेकर यांच्या बाबतीत.
नाना पाटेकर यांच्या गाडीला पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघात झाला, त्यांना हॉर्ट अॅ्टक आला अशा अफवांनी आज सकाळपासून सोशल मीडिया,व्हाटसअपवर धुमाकूळ घातला होता. मात्र, खुद्द नाना पाटेकर यांनी झी मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, अरे,मला काहीही झाले नाही, मी एकदम ठणठणीत आहे. माझ्या बाबत अशा बातम्या पसरवून कोणाचा विकृत आनंद मिळत असेल तर त्याला आनंद घेऊ द्या.
मला काहीही झाले नाही मी सुखरूप आहे. आज डबिंगच्या कामात व्यस्त होतो त्यामुळे माझा फोन बंद होता. त्यामुळे कुणाला तरी छान गंमत सुचली वाटतं. पण अशा गमतीनं लोकांना त्रास होतो हे त्याला कळत नाही अशी खंतही नानांनी व्यक्त केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 31, 2013, 19:42