Last Updated: Monday, June 2, 2014, 17:02
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसाजिद खानचा आगामी चित्रपट ‘हमशकल्स’ मध्ये रितेश देशमुखने पुन्हा एकदा मुलीच्या गेटअपमध्ये दिसणार आहे. रितेशने एका गाण्यात स्कर्ट घातला आहे, विशेष म्हणजे रितेशने हा स्कर्ट आपली पत्नी जेलेनिया डिसुजाकडून उधार घेतला होता.
रितेश देशमुखला विचारण्यात आले, सैफ राम कपूरमध्ये सेटवर सर्वात सुंदर मुलगी कोण होती, तेव्हा त्याने सैफचे नाव घेतले. सैफचा लूक खूप सेक्सी आणि परफेक्ट होता. करिनाने त्याला परफेक्ट लूक देण्यासाठी खूप मदत केली आहे.
रितेशने आपल्या लूकबद्दल बोलताना सांगितले, मी सुद्धा माझी पत्नी जेलेनियाकडून एक स्कर्ट उधार मागितली होती. मी गाण्यात जो स्कर्ट घातला आहे. तो जेलेनियाचा आहे. रितेश, सैफ आणि राम कपूर यात चित्रपटात ट्रिपल रोलमध्ये दिसणार आहे. चित्रपट २० जूनला रिलीज होणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 2, 2014, 16:54