ड्रग तस्कराशी केले ममता कुलकर्णीने लग्न, indiatvnews.com Mamta Kulkarni`s back in news; this time for marrying

ड्रग तस्कराशी केले ममता कुलकर्णीने लग्न!

ड्रग तस्कराशी केले ममता कुलकर्णीने लग्न!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
१९९० च्या दशकातील बॉलिवुड अभिनेत्री ममता कुलकर्णीने दुबईच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ड्रग्स माफिया विकी गोस्वामीशी लग्न करून त्याला जेलमधून बाहेर काढले असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

ममता बऱ्याच कालावधीपासून गोस्वामीसोबत डेटिंग करत होती. एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर टॉपलेस पोज दिल्यानंतर चर्चेत आलेल्या ममता कुलकर्णीचे फिल्म करिअर संपल्यानंतर तिचे ड्रग्स माफियाशी संबंध असल्याचे प्रकरण समोर आले होते.

ममताने १५ नोव्हेंबर २०१२ रोजी विकीशी लग्न करून त्याला दुबईच्या जेलमधून बाहेर काढले. विकीला दुबई पोलिसांनी ड्रग्सच्या तस्करीत १९९७ ला पकडले होते. तेव्हापासून तो दुबईच्या जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.

या संदर्भात बातमी अशीही आहे की, विकीने इस्लाम कबूल केला आणि ममताशी लग्न गेले. विकी जेव्हा जेलमध्ये होता, त्यावेळी ममताने त्याचा रिअल एस्टेटचा बिझनेस सांभाळला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विकी २०१२मध्ये भारतातही आला होता. पण तो लगेचच केनियामध्ये रवाना झाला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 10, 2013, 15:24


comments powered by Disqus