पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’!, mamta kulkarni convert into islam

पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’!

पतीनंतर ममता कुलकर्णीनंही स्वीकारला ‘इस्लाम’!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

बॉलिवूडमधली एकेकाळची हॉट अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनं इस्लामचा स्वीकार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता सध्या तिचा पती विक्की गोस्वामी याच्यासोबत नैरौबीमध्ये राहतेय.

विक्की गोस्वामी याला १९९७ मध्ये ११.५ टन ड्रग्सच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. विक्कीनं दुबईच्या तुरुंगात असताना इस्लामचा स्वीकार केला होता. आता, त्याच्या पाठोपाठ त्याची पत्नी आणि बॉलिवूडमध्ये अनेकदा वेगवेगळ्या वादांमध्ये अडकलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी हिनंही इस्लामचा स्वीकार केलाय.

जवळपास सहा मिलियन डॉलरच्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात विक्कीला २५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो दुबईच्या एका तुरुंगात होता. पण, चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली. ५१ वर्षीय विक्कीला १५ नोव्हेंबर, २०१२ रोजी दुबई तुरुंगातून सोडण्यात आलं. जेलमध्ये असतानाच विक्कीनं इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि ममता कुलकर्णी हिच्याशी विवाहही केला होता.

स्थानिक कोर्टाच्या आदेशनांतर विक्कीला भारताच्या ताब्यात देण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्की डिसेंबर २०१२ मध्ये भारतात आला होता. त्यानंतर ताबडतोब तो केनियामध्ये निघून गेला. भारतात विक्कीविरुद्ध कोणताही खास गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे इथून त्याला नैरोबीला जाणं काही कठिण गोष्ट नव्हती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 15, 2013, 12:49


comments powered by Disqus