Last Updated: Wednesday, May 21, 2014, 07:30
www.24taas.com, वृत्तसंस्था, हैदराबादअभिनेत्री श्रुती हसन हिचे बोल्ड फोटो अनधिकृतपणे ऑनलाइन अपलोड करण्यात आल्याने ती खूपच चिडली आहे. तिने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
श्रुतीने तक्रार केल्याची माहिती, एका सीआयडीच्या अधिकाऱ्यांने दिली. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण सीआयडीकडे तपासासाठी देण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी श्रुती तेलगू सिमेना ‘येवाडू’ याचे शुटींग करीत होती. यावेळी काही फोटो काढण्यात आले होते. यातील काही फोटो जाणून बुजून काढण्यात आलेत. हेच फोटो अनधिकृतपणे ऑनलाईन टाकण्यात आलेत, असे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेच भडकावू फोटो लिक झाले आहेत. यातील काही फोटो अनधिकृतपणे काही संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, May 21, 2014, 07:30