Last Updated: Thursday, December 26, 2013, 20:22
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेता इरफान खान नेहमी वैविध्यपूर्ण भूमिका करून प्रेक्षक आणि समिक्षकांची दाद मिळवली आहे. आता तो आपल्या आगामी चित्रपटात एक पॉर्न फिल्म दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
बी-टाऊनमधील चर्चेनुसार तिग्मांशु धुलिया हा चित्रपट बनवत असून याचे नाव `द किलिंग ऑफ़ अ पोर्न फ़िल्ममेकर` आहे. या चित्रपटात इरफान पॉर्न फिल्म दिग्दर्शकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ही काहणी अशा व्यक्तीची आहे की जो लोकांच्या बाथरूम, बेडरूम आणि अत्यंत खासगी ठिकाणांवर छुपे कॅमेरे लावतो. त्या आधारे पॉर्न फिल्मची निर्मिती करतो.
इरफान यापूर्वी तिग्मांशु धुलियाच्या ‘पान सिंह तोमर’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाद्वारे इरफान आणि तिग्मांशु यांना चांगली दाद मिळाली होती. तसेच या वर्षी रिलिज झालेल्या ‘लंच बॉक्स’ या इरफानच्या चित्रपट लोकांना खूप भावला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, December 26, 2013, 20:22