शाहिद आणि सोनाक्षीचं गॅटमॅट?, Is Shahid Kapoor dating Sonakshi Sinha?

शाहिद आणि सोनाक्षीचं गॅटमॅट?

शाहिद आणि सोनाक्षीचं गॅटमॅट?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूडमधल्या अफेअर्सची गोष्टच निराळी...इथे कधी कोणाच नाव कोणासोबत जोडलं जाईल याचा थांगपत्ताच नसतो..असंच आता झालंय ते शाहीद कपूर सोबत...शाहीदचं पुन्हा एक नवीन प्रकरण पुढे आलंय.. शाहिद आता बॉलीवूडची हॉट गर्ल सोनाक्षी सोबत डेटींग करत असल्याचं कळतंय..

शाहीद कपूर सिनेमात जिच्यासोबत असेल तिच्यासोबत एखादं प्रकरण करतोच हा इतिहास आहे..पण याला सोनाक्षी सिन्हा अपवाद होती..आर.राजकुमार पुर्ण झाला तरी दोघांच्या अफेअरची मात्र कुठेच चर्चा नव्हती..शाहीदने सोनाक्षीला याबाबत धन्यवादही दिले होते..पण काहीदिवस झाल्यानंतर इथेही शाहीदने आपला रेकॉर्ड कायम ठेवला..आता दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याची चर्चा आहे..

सिनेमा झाला तरी दोघंही संपर्कात आहेत..दोघे डेटला जातायेत..दोघांनाही एकमेकाची संगत आवडू लागल्याचं कळतंय..यापूर्वीही अनेकदा शाहीदने डेटींग केल्याचं समोर आलं होतं..शाहीदच्या गर्लफ्रेंडची लिस्ट तर संपायचं नावचं घेत नाही...

2004 मध्ये करिना-शाहीदचं अफेअर संपूर्ण बॉलीवूडला माहीत होतं..करिना सोबत ब्रेकअप झाल्यानंतर 2007 मध्ये सानिया मिर्झासोबतच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या..त्यानंतर मग प्रियांका चोप्रा, विद्या बालन, अनुष्का शर्मा, बिपाशा बसू...आणि आता सोनाक्षी सिन्हा...असंही कळतंय की सध्या शाहीद आशिकी फेम श्रद्धा कपूरच्या प्रेमात पडतोय..आता शाहीदची ही नवी प्रकरणं किती दिवस चालतायेत हेच पाहायला हवं...


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 7, 2014, 21:19


comments powered by Disqus