जगाला 'त्याच्या' मृत्यूची खंत, पण जॅकी म्हणतो `मी जिवंत!` Jackie Chan clears air on online death hoax

जगाला 'त्याच्या' मृत्यूची खंत, पण जॅकी म्हणतो `मी जिवंत!`

जगाला 'त्याच्या' मृत्यूची खंत, पण जॅकी म्हणतो `मी जिवंत!`
www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग

मार्शल आर्ट्स चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॅकी चॅन हा भारतात चायनिज फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित असताना जगभरात त्याच्या मृत्यूच्या बातमीने खळबळ माजली होती. अखेर आपण जिवंत आहोत, हे जगाला सांगण्यासाठी जॅकी चॅनने फेसबुकचा आधार घेतला.

“काल ३ वाजता मी विमानाने भारतातून बीजिंगला आलो. मला झोपायलाही वेळ मिळाला आणि घराची स्वच्छताही करायला जमली नाही. आज मला अचानक माझ्या साखरपुड्याच्या अफवेबद्दल माझं अभिनंदन करत होते. नंतर, मी जिवंत हे की नाही, हे तपासण्यासाठी सगळेजण मला कॉल करू लागले.” असं जॅकी चॅनने फेसबुकवर लिहिलं आहे. “मी जर मेलो, तर मी सघल्यांना त्याबद्दल जगाला सांगेन.” असंही त्याने लिहिलं आहे. त्याचबरोबर जॅकी चॅनने आजच्या तारखेचं वर्तमानपत्र हातात असलेला आपला फोटो काढून फेसबुकवर अपलोड केला आहे. ऑस्ट्रियामध्ये शुटिंग करताना अपघातात जॅकी चॅनचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती.

एक आंतरराष्ट्रीय वेबसाइट यासंदर्भात कुचाळक्या करते. या वेबसाईटवर कुठल्याही सेलिब्रिटीचं नाव टाकल्यास तिच्या मृत्यूची बातमी तयार होऊन ती जगभरात पसरते. यापूर्वी अनेक सेलिब्रिटींना या बातमीचा फटका बसला आहे. भारतीय अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याही अपघाती मृत्यूची अफवा या वेबसाइटवरून प्रसारित झाली होती.

First Published: Wednesday, June 26, 2013, 18:44


comments powered by Disqus