Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:51
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवं वळण लागण्याची शक्यता आहे. जिया खानच्या आईने पोलिसांकडे दिलेल्या जिया खानच्या ६ पानी सुसाइड नोटमधील अक्षर तिचं नसल्याचा संशय पोलिसांना आला आहे.
२५ वर्षीय अभिनेत्री जिया खानने ३ जून रोजी जुहूमध्ये आपल्या राहात्य घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर जियाची आई आणि बहिणीने जियाचा बॉयफ्रेंड सूरज पांचोलीवर मानसिक आणि शारीरिक अत्याचाराचे आरोप केले. सूरजच्या आईने या आरोपांसाठी मीडियाला जबाबदार धरलं. जिया खानच्या मृत्यूपश्चात तिच्या घरी आढळलेल्या ६ पानी पत्रात तिने सूरजवर आपला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. तसंच आपल्याला गर्भपात करावा लागल्याचंही तिने या पत्रात म्हटलं होतं.
यानंतर पोलिसांना सूरजच्या घरी जियाची ५ प्रेमपत्रं सापडली. मात्र या प्रेमपत्रातील अक्षर जियाच्या ६ पानी प्रेमपत्रातील अक्षरापेक्षा वेगळं असल्याचं समोर आलं. हस्ताक्षर विशेषज्ञांनी अक्षरांमधील फरक ओळखला आहे. त्यामुळे जिया खानच्या आत्महत्येच्या प्रकरणाला आता नवीन वळण लागण्याची शक्यता आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, June 18, 2013, 16:51