आत्महत्येपूर्वी जिया दारूच्या नशेत , Jiah Khan suicide before drinking

आत्महत्येपूर्वी जिया दारूच्या नशेत

आत्महत्येपूर्वी जिया दारूच्या नशेत
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘नि:शब्द’ची अभिनेत्री जिया खानने आत्महत्या करण्यापूर्वी दारू प्यायली होती, हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे या प्रकणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज याच्याशी तिचे प्रेम संबंध आणि लिव्ह इन संबंध होते.

जियाच्या आत्महत्येनंतर आदित्य पांचोली याचा मुलगा सूरज यांची पोलिसांनी चौकशी केलेय. तर सूरज सध्या जामिनावर बाहेर आला आहे. आपले लिव्ह इन आणि प्रेमसंबंध होते, अशी कबुली सूरजने पोलिसांना दिली होती. त्यामुळे या प्रकरणात काय निष्पन होते याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आता जियाने आत्महत्येपूर्वी दारू प्यायलायचे स्पष्ट झालेय. त्यामुळे आता तपास कोणत्या दिशेन होणार याची उत्सुकता लागली आहे.

जिया खाने १६० मिलिग्रॅम मद्यप्राशन केले होते, असा अहवाल कालिनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेने पोलिसांना दिला आहे. जियाने प्रमाणापेक्षा जास्त मद्य घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद केलेय.

आत्महत्येपूर्वी जियाने मद्यप्राशन केल्याचे आणि ताण कमी करणाऱ्या गोळ्या खाल्ल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले होते. मात्र त्यावर विसंबून न राहता जुहू पोलिसांनी जियाचा ‘व्हिसेरा’ न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रासायनिक तपासणीसाठी पाठवला होता. तपासणीनंतर हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. तसेच रक्तात दारूचे प्रमाण १०० मिलीग्रॅम आढळले आहे. त्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेणार याची उत्सुकता लागलेय.

# इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

# झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 9, 2013, 10:54


comments powered by Disqus